शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

३० विरुद्ध २४ राजकीय सामना, एनडीएची दिल्लीत तर विरोधकांची बंगळुरात बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 07:22 IST

एनडीएची दिल्लीत तर विरोधकांची बंगळुरूत बैठक, नवे मित्र जोडण्याचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्ष आपआपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. एनडीएची नवी दिल्लीत मंगळवारी बैठक होत असून, जवळपास ३० पक्ष या आघाडीत सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, तर बंगळुरूत सोमवारी आणि मंगळवारी २४ विरोधी पक्ष बैठकीसाठी एकत्र येणार आहेत. 

एनडीएची बैठक भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सहकारी पक्षांशिवाय भाजपने नवीन मित्रपक्षांना आणि माजी सहकाऱ्यांनाही आमंत्रित केले आहे. दिल्लीत अशोक हॉटेलमध्ये मंगळवारी संध्याकाळी ही बैठक होणार आहे. बिहारमधील चार प्रमुख नेत्यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) चिराग पासवान, हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे जीतन राम मांझी, राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र सिंह कुशवाह आणि विकासशील इंसान पक्षाचे मुकेश सहानी यांचा त्यात समावेश आहे. 

उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील घोसी येथील समाजवादी पक्षाचे आमदार दारासिंह चौहान यांनी शनिवारीच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला. एन.चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलुगू देसम पक्ष आणि बादल कुटुंबाच्या नेतृत्वाखालील शिरोमणी अकाली दल यांच्याबाबत चर्चा सुरू असली, तरी ते एनडीएत सहभागी होणार नाहीत, असे सांगितले जात आहे. भाजप या पक्षांशी युती करणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. पंजाबमध्ये एकट्याने लढण्याची आणि आंध्र प्रदेशमध्ये पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षासोबत युती करण्याची त्यांची योजना आहे. पवन कल्याण यांना एनडीएच्या बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), लोक जनशक्ती पार्टी (रामविलास), हिंदुस्थानी अवाम मोर्चा, राष्ट्रीय लोक समता पार्टी, व्हीआयपी हे सत्ताधारी एनडीएत प्रवेश करणार आहेत.

एनडीएमध्ये सध्या कोण?एनडीएमध्ये सध्या २४ पक्ष आहेत. यात भाजप, अण्णाद्रमुक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, नॅशनल पीपल्स पार्टी, एनडीपीपी, एसकेएम, जेजेपी, आयएमकेएमके, एजेएसयू, आरपीआय, मिझो नॅशनल फ्रंट, टीएमसी, आयपीएफटी (त्रिपुरा), बोडो पीपल्स पार्टी, पीएमके, एमजीपी, अपना दल, आसाम गण परिषद, राष्ट्रीय लोक जनशक्ती पार्टी, निषाद पार्टी, यूपीपीएल, एआयआरएनसी, शिरोमणी अकाली दल संयुक्त (ढींढसा) आणि जनसेना (पवन कल्याण) यांचा समावेश आहे.   

ओबीसी नेते ओमप्रकाश राजभर एनडीएत उत्तर प्रदेशमधील माजी मंत्री आणि ओबीसी नेते ओमप्रकाश राजभर यांच्या नेतृत्वाखाली सुहेलदेव भारतीय समाज पार्टी रविवारी एनडीएत सहभागी झाली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राजधानी दिल्लीत भेट घेतल्यानंतर राजभर यांनी ही माहिती दिली. शाह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “दिल्लीत ओमप्रकाश राजभर यांची भेट घेतली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. एनडीए परिवारात मी त्यांचे स्वागत करतो.” 

जेडीएससोबत आघाडीचे संकेत nभाजपचे ज्येष्ठ नेते बसवराज बोम्मई यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी जनता दल (सेक्युलर) हा पक्ष एनडीएत सहभागी होण्यासाठी चर्चेचे संकेत दिले. nआमचे नेतृत्व आणि जेडी(एस) अध्यक्ष एच.डी. देवेगौडा यांच्यातील चर्चेवर हे अवलंबून असेल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसJ P Naddaजगत प्रकाश नड्डाNarendra Modiनरेंद्र मोदी