शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची 30% पगार कपात?, जाणून घ्या व्हायरल सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 17:08 IST

देशात गेल्या ५० दिवसांपासून लॉकडाऊन सुरू असून १७ मे पर्यंत हा लॉकडाऊन कायम राहणार आहे. कोरोनाच्या या संकटाचा परिणाम देशातील सर्वच घटकांवर झाला आहे

नवी दिल्ली - लॉकडाऊनचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला असून सरकारी तिजोरी संकटात सापडली आहे. त्या पार्श्वभूमीवर महसूल वाढविण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी सरकारकडून काही  उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळेच, केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतर, सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे. त्यानुसार, केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात ३० टक्के कपात करण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत केंद्रीयमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

देशात गेल्या ५० दिवसांपासून लॉकडाऊन सुरू असून १७ मे पर्यंत हा लॉकडाऊन कायम राहणार आहे. कोरोनाच्या या संकटाचा परिणाम देशातील सर्वच घटकांवर झाला आहे. अगदी कामगार, मजूरांपासून ते देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक आणि अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळेच, कोरोनाविरुद्धच्या लढाईत देशातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. त्यासाठी, पीएम केअर फंडात निधी देण्याची विनंतीही त्यांनी केली होती. शासन स्तरावरही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळेच सरकार परिस्थितीनुरूप निर्णय घेत आहे. त्यातून आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या महाभाई भत्त्यात कुठलीही वाढ होणार नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. आता, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात ३० टक्के कपात होणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरत आहे. मात्र, पीआयबीने याबाबत खुलासा केला आहे. 

टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीच्या वृत्ताचा हवाला देत, केंद्र सरकारकडे असा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे पीआयबीने स्पष्ट केले आहे. तसेच, तसेच, यापूर्वीच मंत्रीमहोदयांनी ते नकारले आहे, असेही पीआयबीने स्पष्ट करत संबंधित वृत्त चुकीचे असल्याचे म्हटलं आहे. पीआयबीचे हे ट्विट केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी रिट्विट करत ही फेक न्यूज असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या सर्वच कर्मचारी आणि निवृत्ती पेन्शनधारकांना मिळणाऱ्या पगारात जुलै २०२१ पर्यंत कुठलीही वाढ होणार नसल्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. १ जानेवारी २०२० ते जुलै २०२१ पर्यंत केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वेतनात वाढ मिळणार नाही. म्हणजेच, जवळपास दीड वर्षे या सरकारी लाभधारकांना अधिकचा भत्ता आणि पैसे मिळणार नाहीत. रेल्वे कर्मचाऱ्यांनाही केंद्राचा हा नियम लागू असणार आहे. या सर्व कर्मचारी आणि लाभधारकांना सद्यस्थितीतील वेतनानुसार पगार मिळेल, असेही केंद्राने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Governmentसरकारcorona virusकोरोना वायरस बातम्याEmployeeकर्मचारीViral Photosव्हायरल फोटोज्ministerमंत्रीTwitterट्विटर