मुंबईच्या दोघा ठकसेनांचा जामीन फेटाळला घर गहाण ठेवून महिलेने दिले 30 लाख : केवळ साडेपंधरा लाखांची परतफेड

By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:19+5:302015-08-27T23:45:19+5:30

सोलापूर : घर गहाण ठेवून नीलकंठ बँकेतून 30 लाख रुपये कर्ज मिळवले. त्यापैकी केवळ 15 लाख 40 हजार रुपये भरले. उर्वरित रक्कम न भरता व्ही. एस. देसाई या महिलेची फसवणूक करणार्‍या मुंबईच्या कांदिवली भागात राहणार्‍या सागर अशोक कोठारी आणि कृणाल राजेश कोठारी या दोघा ठकसेनांचा जामीन अर्ज न्यायदंडाधिकारी ऋतुजा भोसले यांनी फेटाळून लावला.

30 lakhs given to the woman by mortgaging her house for two crores of rupees, only repayment of Rs. 15,500 | मुंबईच्या दोघा ठकसेनांचा जामीन फेटाळला घर गहाण ठेवून महिलेने दिले 30 लाख : केवळ साडेपंधरा लाखांची परतफेड

मुंबईच्या दोघा ठकसेनांचा जामीन फेटाळला घर गहाण ठेवून महिलेने दिले 30 लाख : केवळ साडेपंधरा लाखांची परतफेड

लापूर : घर गहाण ठेवून नीलकंठ बँकेतून 30 लाख रुपये कर्ज मिळवले. त्यापैकी केवळ 15 लाख 40 हजार रुपये भरले. उर्वरित रक्कम न भरता व्ही. एस. देसाई या महिलेची फसवणूक करणार्‍या मुंबईच्या कांदिवली भागात राहणार्‍या सागर अशोक कोठारी आणि कृणाल राजेश कोठारी या दोघा ठकसेनांचा जामीन अर्ज न्यायदंडाधिकारी ऋतुजा भोसले यांनी फेटाळून लावला.
दोघे ठकसेन एस. के. ट्रेडिंग कंपनीचे भागीदार असून, फिर्यादी महिलेचा भाऊ विरल देसाई आणि कोठारी यांच्यात व्यावसायिक संबंध होते. या संबंधाचा फायदा घेत आरोपीने विरलच्या बहिणीस गाठून व्यवसाय वृद्धीसाठी 30 लाख रुपयांची मागणी केली. दोघांवर विश्वास ठेवून तिने नीलकंठ बँकेत स्वत:चे घर गहाण ठेवून 30 लाख रुपये दिले. दरमहा 1 लाख 10 हजार रुपयांप्रमाणे 36 हप्ते फेडण्याचे दोघांनी कबूल केले होते; मात्र दोघांनी 15 लाख 40 हजार एवढीच रक्कम फेडली. थकबाकीपोटी त्यांनी दिलेले धनादेश वठले नाही म्हणून महिलेने दोघांच्या विरोधात जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. नंतर हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला. दोघांना न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली.
गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून, पोलिसांचा तपास अद्याप सुरु आहे असा न्यायालयाने काढलेला निष्कर्ष आणि मूळ फिर्यादीचे वकील शशी कुलकर्णी यांनी मांडलेला युक्तिवाद ग्रा? धरून आरोपींचा जामीन अर्ज नामंजूर झाला. यात मूळ फिर्यादीतर्फे अँड. शशी कुलकर्णी, अँड. प्रशांत नवगिरे, आरोपींतर्फे अँड. ऋचिता धारु (मुंबई) तर सरकारतर्फे अँड. चिंचवले यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: 30 lakhs given to the woman by mortgaging her house for two crores of rupees, only repayment of Rs. 15,500