तस्करांच्या तावडीतून ३० मुलींची सुटका
By Admin | Updated: August 25, 2014 04:19 IST2014-08-25T04:19:38+5:302014-08-25T04:19:38+5:30
ओडिशाच्या गंजाम आणि कंधमाल जिल्ह्यात अल्पवयीन मुलींसह ३० तरुणींची मानव तस्करांच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे.

तस्करांच्या तावडीतून ३० मुलींची सुटका
ब्रह्मपूर (ओडिशा) : ओडिशाच्या गंजाम आणि कंधमाल जिल्ह्यात अल्पवयीन मुलींसह ३० तरुणींची मानव तस्करांच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे.
शुक्रवारी ब्रह्मपूर रेल्वे स्थानकावरून आठ अल्पवयीनांसह २४ मुलींची मुक्तता करण्यात आली. कंधमाल जिल्ह्याच्या उदयगिरी येथे भुवनेश्वरकडे जाणाऱ्या एका बसमधून सहा मुलींची सुटका करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.
तस्कर या मुलींना तामिळनाडूमध्ये घेऊन जात होते. सर्व मुलींना चाईल्ड लाईन या संस्थेच्या सुपूर्द करण्यात आले आहे.
या संदर्भात पोलिसांनी कासियाल दिग्गल या तस्कराला अटक केली. या मुली बालीगुडा, राईकिया आणि दरियांगबाडी भागात राहणाऱ्या आहेत. सर्वांचे वय २३ वर्षांपेक्षा कमी आहे. या सर्वांना शिवणकाम करण्याचे आमिष दाखवून तामिळनाडूत नेले जात होते. परंतु तेथे त्यांना वेश्याव्यवसायात ढकलले जात असल्याची माहिती आहे. (वृत्तसंस्था)