शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

३० कोटी लोकांचे ‘दम मारो दम’, जगात अमली पदार्थांची मागणी वाढली; इंजेक्शन टाेचून घेण्याच्या प्रमाणात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 07:05 IST

Narcotics: जगभरात अमली पदार्थांचे उत्पादन, तस्करी आणि वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे लोकांना विविध आजार जडण्याचे प्रमाणही वाढले आहे.

न्यूयॉर्क : जगभरात अमली पदार्थांचे उत्पादन, तस्करी आणि वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे लोकांना विविध आजार जडण्याचे प्रमाणही वाढले आहे. अमली पदार्थ टोचून घेण्याचे प्रमाणही वाढले असून, स्वस्तात आणि सहज मिळणारी बेकायदा औषधे यामुळे जागतिक संकट निर्माण झाल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालात म्हटले आहे. २०२१ मध्ये कोकेन घेणाऱ्यांची संख्या २३ टक्क्यांनी वाढून २९.६ कोटींवर पोहोचली आहे. २०११ मध्ये हीच संख्या २४ कोटी इतकी होती.

अमली पदार्थांच्या वाढत्या वापरामुळे आजारी पडण्याची संख्याही प्रचंड वाढली आहे. गेल्या १० वर्षांत विकारांनी ग्रस्त लोकांची संख्या ४५ टक्क्यांनी वाढून ४ कोटी इतकी झाली आहे. यातील पाच पैकी केवळ एकाला उपचार मिळाले. कोकेन उत्पादनात वाढ होऊन पुरवठा वाढला. कोकेन जप्त करण्याच्या कारवाईतही वाढ झाल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या ड्रग्ज अहवालात म्हटले आहे.

अमली पदार्थ कुठे जास्त घेतात? अमेरिका, पश्चिम व मध्य युरोपमध्ये अमली पदार्थ विक्रीची मोठी बाजारपेठ असली तरी ऑस्ट्रेलियामध्येही अमली पदार्थांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. आफ्रिका, आशियामध्येही बाजारपेठा वाढत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

महिला का करतात नशा? कमी उत्पन्न, कमी बचत आणि जास्त धोका. नोकरीच्या कमी संधी. कुटुंबाची अतिरिक्त जबाबदारी. घरगुती हिंसाचारएचआयव्हीचा धोका किती?जे  स्वत: ड्रग्ज टोचून घेतात    ३५ पट ट्रान्सजेंडर महिला    ३४ पट महिला सेक्स वर्कर    २६ पट समलिंगी पुरुष    २५ पट

२०१४ नंतर अमली पदार्थ जप्तीत ३० पट वाढ अमली पदार्थांविरुद्धच्या  कारवाईमुळे २००६-१३ मध्ये ७६८ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते, तर २०१४ ते २०२२ दरम्यान ही जप्ती जवळपास ३० पटीने वाढून २२ हजार कोटी रुपयांवर गेली आहे.

कुठे, काय वापरला जातो?रशिया, युरोप : ऍम्फेटामाइन्स भारत : ऍम्फेटामाइन्स ब्राझील, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका : कोकेन

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार भारतातून अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करेल. देशातून अमली पदार्थांची तस्करी होऊ दिली जाणार नाही.    - अमित शाह,     केंद्रीय गृहमंत्री

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थ