शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर खोऱ्यात ३ दहशतवाद्यांचा खात्मा, अखनूर क्षेत्रात लष्करी ताफ्यावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 06:29 IST

लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, जोगवान येथील शिवासन मंदिराजवळ लष्कराची रुग्णवाहिका व इतर वाहनांवर गोळीबार होताच सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांचा माग काढण्यास सुरुवात केली व त्यांना बट्टल भागामध्ये गाठले.

- सुरेश एस. डुग्गरजम्मू : जम्मू-काश्मीरमधील अखनूर क्षेत्रात प्रत्यक्ष ताबा रेषेपासून जवळ असलेल्या गावात सोमवारी सकाळी लष्कराच्या रुग्णवाहिकेवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. हल्ला करणाऱ्या ३ दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाने खात्मा केला. आणखी हल्लेखोरांच्या शोधासाठी रणगाड्यांची मदत घेतली आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात सुदैवाने एकाही जवानाला इजा झाली नाही.

लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, जोगवान येथील शिवासन मंदिराजवळ लष्कराची रुग्णवाहिका व इतर वाहनांवर गोळीबार होताच सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांचा माग काढण्यास सुरुवात केली व त्यांना बट्टल भागामध्ये गाठले. सोमवारी पहाटे तीन दहशतवादी सीमेपलीकडून घुसखोरी करून काश्मीरच्या हद्दीत आले होते. तिथून ते एका मंदिरात शिरले व मोबाइलवर साथीदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी लष्करी ताफा जाताना रुग्णवाहिकेवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. 

सीमावर्ती भागात सुरक्षा दलांना सतर्कता इशारा- जम्मू-काश्मीरमध्ये याआधी गंदरबल, बारामुल्ला येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यांमुळे जम्मू, कठुआ, सांबा, पुंछ, राजौरी या सीमावर्ती भागात सुरक्षा दलांच्या जवानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी