शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

Jammu-Kashmir : बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; तीन दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 10:13 IST

Jammu-Kashmir : गुरुवारी रात्री बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाल्याचे सांगण्यात आले.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बडगाममधील जोलवा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक (Encounter at Zolwa Kralpora Chadooraof Budgam)  झाली. या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाल्याचे वृत्त आहे. बडगाममध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याचे आयजीपी काश्मीर यांनी सांगितले. तसेच, चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याची संघटना आणि त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. त्यांच्याकडून शस्त्रे आणि दारूगोळ्यांसह अनेक आपत्तिजनक साहित्य जप्त करण्यात आल्याचे आयजीपींनी सांगितले.

दरम्यान, गुरुवारी रात्री बडगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाल्याचे सांगण्यात आले. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलांनी बडगाम जिल्ह्यातील जोलवा गावात शोध आणि घेराबंदी मोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली. 

बुधवारी पुलवामामध्ये चकमकजम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानी नागरिक आहे. या दहशतवाद्यांकडून शस्त्रे, स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदगाम गावामध्ये शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यावेळी दहशतवादी असलेल्या ठिकाणाला घेरण्यात आले. दहशतवाद्यांना शरणागती पत्करण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. अखेर चकमकीमध्ये तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. 

काश्मीरमधील पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. त्यामध्ये एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश आहे. त्यांच्याजवळून दोन एम-4 कार्बाइन्स आणि एक एके-47 रायफल आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, नवीन वर्षाच्या पाचव्या दिवसांतील ही पाचवी चकमक आहे. अलीकडेच दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्ये जवानांनी  9 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी