शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

जवानांसोबतच्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा, जून महिन्यातच ३८ अतिरेक्यांना केलं ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 7:51 AM

अहवालानुसार लष्कराच्या १९ राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकानं रुनिपोरा भागात संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांना ठार केलं आहे.

काश्मीरः जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये जवान अन् पोलिसांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.  ही चकमक अनंतनागच्या रुनिपोरा  भागात घडल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. आजच्या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांसह यावर्षी जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने 116 अतिरेक्यांना ठार केले आहेत. त्यापैकी या महिन्यातच 38 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अहवालानुसार लष्कराच्या १९ राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकानं रुनिपोरा भागात संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांना ठार केलं आहे.घटनास्थळावरून रायफल व पिस्तूल जप्तसुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना वेढा घालण्यास सुरुवात करताच या भागात लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. पोलीस आणि सीआरपीएफनेही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. घटनास्थळावरून सैन्याने शस्त्रे हस्तगत केली आहेत. जप्त केलेल्या शस्त्रांमध्ये एक रायफल आणि 2 पिस्तूल यांचा समावेश आहे. घटनास्थळी पोलीस कारवाई सुरू असून, पोलिसांनी परिसराला घेराव घालून तेथे शोधमोहीम राबवली आहे.आतापर्यंत 116 दहशतवाद्यांना केले ठारअधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, आज झालेल्या चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांसह सुरक्षा दलाने यावर्षी 116 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जून महिन्यात अवघ्या 29 दिवसांत 38 अतिरेकी ठार करण्यात आले आहेत. लष्करानं ठार केलेल्या दहशतवाद्यांमध्ये वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांचे 6 कमांडरचाही समावेश आहे. यावर्षी रियाझ नायकू हा दहशतवादीसुद्धा जवानांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाल्याने हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेला मोठा धक्का बसला आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी