गाझियाबादमध्ये एकाच कुटुंबातील तीन बहिणींनी जीवन संपवल्याने खळबळ उडाली आहे. या तीन मुलींनी एवढं टोकाचं पाऊल का उचललं, यामागची वेगवेगळी कारणं सांगितली जात आहेत. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांच्या प्राथमिक तपासामधून वेगळीच माहिती समोर आली आहे. सुरुवातीला या मुलींनी कुठला तरी ऑनलाईन गेम किंवा कोरियन गेमच्या लागलेल्या सवयीमुळे त्यांनी हे कृत्य केल्याचं बोललं जात होतं. मात्र आता पोलिस खात्यातील सूत्रांनी हे दावे फेटाळून लावले आहेत. या तिन्ही मुलींच्या मृत्यूमागचं कारणं कुठलाही ऑनलाईन गेम नाही तर मोबाईल बंद होणे, डिजिटल जगापासून वेगळे होणे आणि कोरियन कल्चरची जडलेली सवय यामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून त्या मुलींनी टोकाचं पाऊल उचललं असावं असं सांगण्यात येत आहे.
याबाबत पोलीस खात्यामधील सूत्रांनी सांगितलं की, आतापर्यंतच्या तापासामध्ये कुठल्याही प्रकारचा कोरियन लव्ह गेम किंवा ऑनलाईन सुसाईड चॅलेंजचे कुठलेही पुरावे सापडलेले नाहीत. तसेच मोबाईल फोनच्या फॉरेन्सिक तपासामध्ये आणि डायरीच्या पानांमध्येही जीवन संपवण्यास प्रवृत्त करणाऱ्या कुठल्या गेम किंवा टास्कचा उल्लेख नाही आहे. त्यामुळे हे प्रकरण कुठल्या ऑनलाईन गेमचं नाही तर डिजिटल कंटेंटची जडलेली सवय आणि त्यापासून अचानक दूर झाल्यामुळे निर्माण झालेल्या तणावाची आहे.
दरम्यान, घटनास्थळावरून पोलिसांना एक आठ पानांची डायरी सापडली आहे. ही डायरी केसमधील एक महत्त्वाचा पुरावा मानली जात आहे. डायरीमध्ये तिन्ही मुलींनी आपल्या मनातील भावना लिहिलेल्या आहेत.
Web Summary : Ghaziabad sisters' suicide wasn't due to online games, police say. Digital withdrawal and Korean culture addiction likely triggered mental stress, leading to the tragic end. Diaries revealed their feelings.
Web Summary : गाजियाबाद में बहनों की आत्महत्या ऑनलाइन गेम के कारण नहीं थी, पुलिस का कहना है। डिजिटल से दूरी और कोरियाई संस्कृति की लत से मानसिक तनाव बढ़ने की संभावना है, जिससे दुखद अंत हुआ। डायरियों में उनकी भावनाएं लिखी थीं।