छत्तीसगढमध्ये ३ नक्षली ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 05:54 IST2018-06-16T05:54:16+5:302018-06-16T05:54:16+5:30

सुकमा जिल्ह्याच्या गट्टापाड आणि टोकनपल्ली खेड्यांजवळील जंगलात शुक्रवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले.

 3 Naxalites killed in Chhattisgarh | छत्तीसगढमध्ये ३ नक्षली ठार

छत्तीसगढमध्ये ३ नक्षली ठार

रायपूर (छत्तीसगढ) : सुकमा जिल्ह्याच्या गट्टापाड आणि टोकनपल्ली खेड्यांजवळील जंगलात शुक्रवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. सकाळी दहाच्या सुमारास ही चकमक झाल्याचे सुकमाचे पोलिसांनी सांगितले.
जिल्हा राखीव दल आणि स्पेशल टास्क फोर्सच्या संयुक्त तुकडीने चिंतागुफाच्या जंगलात गुरुवारी रात्री नक्षलवाद्यांचा शोध घ्यायला सुरवात केली होती. चिंतागुफा हे रायपूरपासून सुमारे ५०० किलोमीटर आहे.
गट्टापाड आणि टोकनपल्ली दरम्यानच्या जंगलात या तुकडीने त्यांना घेरल्यावर नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षादलांनीही प्रतिउत्तरादाखल गोळीबार केला व ही चकमक काही वेळ चालली.
तथापि, नक्षलवादी जंगलात
पळून गेले. तुकडीने त्या भागात
शोध घेतल्यावर तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह गणवेशात आढळले. त्यांच्याजवळ ३१५ बोअरची
रायफल, पितुल अणि लोडिंग गनसह चार शस्त्रे होती. ही शस्त्रे जप्त करण्यात आली.

Web Title:  3 Naxalites killed in Chhattisgarh