लिलावातून तिजोरीत आले ३ कोटी १९ लाख
By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:32+5:302015-08-26T23:32:32+5:30
जुन्नर नगर परिषद : ४६ गाळ्यांचे लिलाव; व्यापारी संकुलातून फायदा

लिलावातून तिजोरीत आले ३ कोटी १९ लाख
ज न्नर नगर परिषद : ४६ गाळ्यांचे लिलाव; व्यापारी संकुलातून फायदालेण्याद्री : जुन्नर नगर परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुलातील व्यापारी गाळ्यांचा उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे घेण्यात आलेल्या ई-टेंडरिंग लिलाव प्रक्रियेत नगरपालिकेच्या तिजोरीत एकूण ३ कोटी १९ लाख ३४ हजार ४०० रुपयांची विक्रमी भर पडली आहे.एकूण ४६ गाळ्यांचे लिलाव झाले. शिवसेना गटनेते मधुकर काजळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे, तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपालिकेच्या मागील सत्ताधार्यांनी दि. ५/८/२०१३ रोजी केलेले लिलाव बोगस व मॅनेज असल्याचे कारण दाखवत रद्द केले होते. त्या वेळेस तत्कालीन सत्ताधार्यांनी मूळ टपरीधारकांचा विश्वासघात करून इतरांच्या नावाने स्वत:च गाळे लाटण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जुन्नर न्यायालयात गटनेते मधुकर काजळे यांनी मनाई दावा दाखल केला होता व जुन्नर न्यायालयाने १५६/३ अन्वये केस दाखल करून घेऊन जुन्नर पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये संबंधितावर गुन्हे दाखल झालेले आहेत. तत्कालीन मुख्याधिकारी व कर्मचार्यांवरदेखील गुन्हे दाखल झाले आहेत. तत्कालीन सत्ताधार्यांनी केलेल्या बोगस लिलावात नगरपालिकेला गाळ्यांच्या लिलावाद्वारे त्या वेळच्या बाजारमूल्यापेक्षाही कमी उत्पन्न मिळाले होते. आताच्या ई-टेंडरिंग लिलावाद्वारे जवळपास सव्वादोन कोटींचे जास्तीचे उत्पन्न नगरपालिकेला मिळणार आहे. तसेच गाळ्यांचे मासिक भाडे, घरपी याचेही उत्पन्न नगरपालिकेला मिळणार आहे. ही सर्व रक्कम विनापरतावा ठेवीचे आहे. त्यामुळे नगरपालिकेला विकासकामांसाठी मोठ्याप्रमाणावर निधी उपलब्ध होणार आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष वारुळे यांनी पारदर्शकपणे ई टेंडरिंग प्रक्रिया राबविली. चौकट४० लाखांपर्यंत बोलीया लिलावात एका गाळ्यासाठी किमान ३ लाख २५ हजारांपासून कमाल ४० लाखांपर्यंत बोली लावण्यात आली.