शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या दुर्घटनेतील ३ मृतदेह सापडले; पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये मृतांची संख्या ८ वर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 11:53 IST

दिल्लीतील पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: मुसळधार पावसामुळे येथील वसंत विहार परिसरात एका बांधकामाच्या ठिकाणी कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्यातून शनिवारी तीन मजुरांचे मृतदेह बाहेर काढले. यासह दिल्लीतील पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. शुक्रवारी वसंत विहार भागात बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळली. घटनेची माहिती दिल्ली आपत्ती निवारण विभागाला पहाटे मिळाली. यांनतर तेथे बचावकार्य सुरू झाले. ढिगाऱ्यातून तीन मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. संतोषकुमार यादव (१९) आणि संतोष (३८) अशी दोघांची नावे आहेत. तिसऱ्या मृत मजुराची ओळख अद्याप पटलेली नाही. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकलेले आहेत की नाही, यासाठी शोधमोहीम सुरू आहे. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि नागरी संस्थांचे पथक संयुक्त बचाव मोहिमेत काम करीत आहेत. तसेच शुक्रवारी पावसाशी संबंधित इतर घटनांमध्ये शहरात पाच जण मृत्युमुखी पडले आहेत.

‘आयएमडी’कडून ऑरेंज अलर्ट जारीदिल्लीत येत्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शनिवारी सांगितले. ८८ वर्षांतील सर्वांत मुसळधार पावसासह दिल्लीत मान्सूनचे आगमन झाले आहे; तसेच पुढील चार दिवस शहरात मुसळधार पावसासाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

अयोध्येत रामपथ जलमय, ६ अभियंते निलंबित२३ जून व २५ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरात रामपथ काही ठिकाणी खचला तसेच तिथे अनेक भागांत पाणी साचले. काही घरे जलमय झाली. त्यामुळे नागरी सुविधा उत्तम स्थितीत राखण्यात निष्काळजीपणा दाखवल्याच्या आरोपावरून तेथील सहा अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. रामपथ व त्याला लागून असलेले १५ उपमार्ग पावसामुळे जलमय होऊन तेथील रहिवाशांचे खूप हाल झाले होते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता ध्रुव अग्रवाल, सहायक अभियंता अनुज देशवाल, कनिष्ठ अभियंता प्रभात पांडे, उत्तर प्रदेश जल निगमचे आनंदकुमार दुबे (कार्यकारी अभियंता), राजेंद्रकुमार यादव (सहायक अभियंता), मोहम्मद शाहिद (कनिष्ठ अभियंता) यांना निलंबित करण्यात आले आहे. रामपथ बांधल्यानंतर काही दिवसांतच तिथे खड्डे पडले होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीRainपाऊसDeathमृत्यू