२९... मनसर
By Admin | Updated: January 29, 2015 23:17 IST2015-01-29T23:17:10+5:302015-01-29T23:17:10+5:30
जनावरांची अवैध वाहतूक

२९... मनसर
ज ावरांची अवैध वाहतूकमनसर : जनावरांना कोंबून घेऊन जात असलेला ट्रक पकडून त्यातील आमडी शिवारात २१ जनावरांची सुटका करण्यात आली. ही कारवाई रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आमडी शिवारात बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास करण्यात आली. जनावरांची अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी आमडी शिवारात नाकाबंदी करून एमपी-०९/एचएफ-४०८० क्रमांकाचा ट्रक पकडला. त्यातील २१ जनावरांची सुटका केली. दरम्यान, ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला. या कारवाईमध्ये दोन लाख रुपये किमतीच्या जनावरांसह एकूण नऊ लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. नागपूर - जबलपूर महामार्गावरून मध्य प्रदेशातील जनावरांची नेहमीच वाहतूक केली जाते. यातील बहुतांश जनावरे कामठी, हैदराबाद व अन्य ठिकाणी असलेल्या कत्तलखान्यात नेली जातात. जनावरांच्या अवैध वाहतूकप्रकरणी कठोर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले. (वार्ताहर)***