शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

'ते' २९ IPS अधिकारी कामचुकार?; डीजीपींच्या लेटरबॉम्बनं पोलीस खात्यात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 1:43 PM

दोन तास लंच, त्यानंतर गाठतात घर; २९ IPS अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणावर डीजीपींचं बोट

भोपाळ: पोलीस महासंचालक विवेक जोहरी यांच्या एका पत्रामुळे सध्या पोलीस खात्यात खळबळ माजली आहे. जोहरी यांच्या पत्रानं पोलीस मुख्यालयात तैनात असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. अनेक आयपीएस अधिकारी कार्यालयात येतच नाहीत. तरीही वेतन घेतात. तर कार्यालयात येणारे काही अधिकारी दोन-दोन तास जेवत बसतात आणि जेवण होताच घर गाठतात, असे अतिशय गंभीर आरोप जोहरींनी त्यांच्या पत्रातून केले आहेत.मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालक असलेल्या विवेक जोहरी यांनी त्यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणावर पत्रातून बोट ठेवलं आहे. भोपाळमधील पोलीस मुख्यालयातील २९ अधिकाऱ्यांबद्दल जोहरी यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. '२९ पैकी १४ अधिकाऱ्यांना लंचसाठी २ तास लागतात. काही अधिकारी तर लंच होताच कार्यालयाचून निघून जातात. त्यानंतर ते कार्यालयात परततच नाहीत. तीन अधिकारी तर कार्यालयात येतच नाहीत. कोणतंही काम न करता ते वेतन आणि सर्व सरकारी सुविधा घेतात,' असं जोहरींनी पत्रात नमूद केलं आहे.डीजीपींनी त्यांच्या पत्रात २९ अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीचा उल्लेख केला आहे. 'कामाच्या वेळेत अधिकारी त्यांच्या चेंबरमध्ये उपस्थित नसतात. काही अधिकारी लंचनंतर कार्यालयात येतच नाहीत,' असं जोहरींनी ६ जून रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. अधिकाऱ्यांनी कामाला महत्त्व द्यावं. सर्व अधिकाऱ्यांनी सकाळी साडे दहा ते साडे पाच वेळेत कार्यालयात रहावं, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. स्पेशल डीजी, एडीजी आणि आयजी दर्जाचे अधिकारी कार्यालयात बसत नाहीत. फोन घेत नाहीत, हे खेदजनक आहे, अशा शब्दांत जोहरींनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. जोहरींनी त्यांच्या पत्रातून २९ अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणाकडे लक्ष वेधलं आहे. 'तीन अधिकारी कार्यालयातच येत नाहीत. १२ जण लंचनंतर कार्यालयात परतत नाहीत. १४ अधिकाऱ्यांना लंच करायला २ तास लागतात,' अशी आकडेवारी डीजीपींनी पत्रात दिली आहे. मात्र त्यांनी कोणाचंही नाव पत्रात नमूद केलेलं नाही. अधिकाऱ्यांच्या अशा वर्तणुकीचा त्यांच्या नेतृत्त्वाखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर परिणाम होतो. भविष्यात हे अधिकारी कार्यालयात उपलब्ध असतील, अशी अपेक्षा जोहरींनी व्यक्त केली आहे. अरविंद केजरीवालांची तब्येत बिघडली; स्वत:ला केलं आयसोलेट, कोरोना टेस्ट होणारबापरे! अवघ्या ५ दिवसांत ५००००; कोरोना रुग्णांचा वेग धडकी भरवणारमहाराष्ट्रात कोरोनाचा कहर असताना मुंबईकरांसाठी 'ही' माहिती सुखावणारी