शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात 29 तर राजस्थानमधून दररोज 14 मुले बेपत्ता, 'क्राय'च्या रिपोर्टमध्ये दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 17:43 IST

स्वयंसेवी संस्था 'क्राय'च्या रिपोर्टनुसार, देशातील अनेक राज्यातून दरवर्षी हजारो मुले बेपत्ता होतात. यात राजस्थान आणि मध्य प्रदेश टॉपवर आहेत.

नवी दिल्ली: 2021 मध्ये मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) दररोज सरासरी 29 आणि राजस्थानमध्ये(Rajasthan)  14 मुले बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 'चाइल्ड राइट्स अँड यू' (CRY) च्या 'स्टेटस रिपोर्ट ऑन मिसिंग चिल्ड्रन' या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालानुसार, उत्तर भारतातील चार प्रमुख राज्यांमध्ये मुले बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. 2021 मध्ये दिल्लीतील आठ जिल्ह्यांमध्ये दररोज पाच मुले बेपत्ता झाली आहेत. तर, उत्तर प्रदेशातील 58 जिल्ह्यांमध्ये दररोज सरासरी आठ मुले बेपत्ता होतात.

मध्यप्रदेश-राजस्थानमध्ये बेपत्ता मुलींची संख्या अधिकअहवालात म्हटले आहे की 2021 मध्ये मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये हरवलेल्या मुलींची संख्या मुलांपेक्षा पाच पट जास्त आहे. नॅशनल क्राईम ब्युरोच्या 2020 च्या आकडेवारीनुसार, मध्य प्रदेशात 8,751 आणि राजस्थानमध्ये 3,179 मुले बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. CRY च्या भागीदार संस्थांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) दाखल केलेल्या अर्जांना उत्तर देताना, सरकारने नोंदवले की 2021 मध्ये, मध्य प्रदेशात 10,648 आणि राजस्थानमध्ये 5,354 मुले हरवल्याची नोंद झाली.

पाच जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक मुले बेपत्ता आरटीआय अर्जांद्वारे गोळा केलेल्या डेटावरून असे दिसून येते की इंदूर, भोपाळ, धार, जबलपूर आणि रीवा हे मध्य प्रदेशातील बेपत्ता मुलांच्या संख्येच्या बाबतीत पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये आहेत. दररोज 24 मुली आणि पाच मुलांसह सरासरी 29 मुले मध्य प्रदेशातून बेपत्ता होतात, असे अहवालात म्हटले आहे.

यूपीच्या 58 जिल्ह्यांमध्ये 2 हजारांहून अधिक मुले बेपत्ता 2021 मध्ये उत्तर प्रदेशातील 75 पैकी 58 जिल्ह्यांमधून एकूण 2,998 मुले - 835 मुले आणि 2,163 मुली - बेपत्ता झाली. राज्यातील बेपत्ता मुलांपैकी सुमारे 88.9 टक्के मुले 12 ते 18 वयोगटातील होती. उत्तर प्रदेशातील बेपत्ता मुलांच्या संख्येच्या बाबतीत पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये लखनौ, मुरादाबाद, कानपूर नगर, मेरठ आणि महाराजगंज यांचा समावेश असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. 

टॅग्स :Missingबेपत्ता होणंCrime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेश