नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 05:26 IST2025-04-29T05:25:52+5:302025-04-29T05:26:27+5:30
दोन्ही देशांनी डिजिटल माध्यमाद्वारे आयोजित कार्यक्रमात समझोत्यावर शिक्कामोर्तब केले. या समारंभात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.

नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
नवी दिल्ली : भारत नौदलासाठी फ्रान्सकडून ६४,००० कोटी रुपयांची २६ लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. यासंबंधीच्या करारावर दोन्ही देशांनी सोमवारी स्वाक्षरी केली. पहलगामच्या हल्ल्यानंतर हा करार झाला आहे.
दोन्ही देशांनी डिजिटल माध्यमाद्वारे आयोजित कार्यक्रमात समझोत्यावर शिक्कामोर्तब केले. या समारंभात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. भारत विमानवाहू जहाज आयएनएस विक्रांतवर तैनात करण्यासाठी फ्रान्सची कंपनी दसॉ ॲविएशनकडून जेट विमान खरेदी करीत आहे.
भारतीय राफेलला बळ देणारी पाच शस्त्रास्त्रे
स्कॅल्प क्षेपणास्त्र : लांब पल्ल्यापर्यंत मारा करणारे क्रूज क्षेपणास्त्र
मेटेयॉर क्षेपणास्त्र : लांब पल्ल्यापर्यंत हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र
लेझर गायडेड बॉम्ब : ५००-२००० पाउंडचा बॉम्ब. लेझरद्वारे अचूक हल्ल्याची क्षमता
नॉन गायडेड क्लासिकल बॉम्ब : जमिनीवर बॉम्बवर्षाव करणारा परंपरागत बॉम्ब