२६ जोडप्यांचा व्हॅलेंटाईन शिर्डी : सामुदायिक विवाह सोहळा, दत्तात्रय ठमाजी शेळके ट्रस्टचा उपक्रम
By Admin | Updated: February 14, 2015 23:50 IST2015-02-14T23:50:33+5:302015-02-14T23:50:33+5:30
शिर्डी : प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. आणि त्याच दिवशी आयुष्यभराचा जोडीदार मिळाला तर तो दिवसच अस्मरणीय होऊन जातो. असे एक नव्हे, तर तब्बल २६ जोडपे शिर्डीत शनिवारी व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत लग्नाच्या बेडीत अडकले.

२६ जोडप्यांचा व्हॅलेंटाईन शिर्डी : सामुदायिक विवाह सोहळा, दत्तात्रय ठमाजी शेळके ट्रस्टचा उपक्रम
श र्डी : प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. आणि त्याच दिवशी आयुष्यभराचा जोडीदार मिळाला तर तो दिवसच अस्मरणीय होऊन जातो. असे एक नव्हे, तर तब्बल २६ जोडपे शिर्डीत शनिवारी व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत लग्नाच्या बेडीत अडकले. नगरसेवक अभय शेळके व सामाजिक कार्यकर्ते धनंजय शेळके यांच्या पुढाकाराने स्व़ दत्तात्रय ठमाजी चॅरिटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सर्वधर्मिय विवाह सोहळ्याचे हे तपपूर्ती वर्ष होते़ विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी विविध ठिकाणांहून जथ्थेच्या जथ्थे शिर्डीत दाखल झाल्याने सकाळपासूनच शिर्डी वर्हाडींनी गजबजून गेली़ सर्व वर्हाडींची साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती़ विवाहापूर्वी सर्व वरांची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली़ यावेळी फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली़ कार्यक्रमस्थळी वर्हाडींच्या मनोरंजनासाठी ऑर्केस्ट्राचे आयोजनही करण्यात आले होते़येथील विठ्ठल लॉन्सवर उत्साहात व मंगलमय वातावरणात मुस्लीम, बौद्ध व हिंदूधर्मियांचे विवाह संपन्न झाले़ यावेळी ह़भ़प़देवानंदजी महाराज, खासदार सदाशिव लोखंडे, संजीवनीचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, विजय कोते आदींनी या उपक्रमाचे कौतूक करत वधू-वरांना आशीर्वाद दिले़ राष्ट्रवादीचे सिद्धार्थ मुरकूटे, छायाताई दत्तात्रय शेळके, सुरेश बनकर, संदीप सोनवणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते़प्रास्ताविक धनंजय शेळके यांनी केले, तर अभय शेळके यांनी आभार मानले़ सूत्रसंचालन राजश्री शेवाळे-पिंगळे यांनी केले़ विवाह संपन्न झाल्यानंतर धनंजय व अभय या दोन्ही बंधूंनी सपत्निक कन्यादान केले़ सोहळ्यासाठी पतिंगराव शेळके, ॲड़शिवाजीराव शेळके, वसंतराव शेळके, डॉ़ पंडित शेळके, महेंद्र शेळके, जितेंद्र शेळके आदींनी विशेष परिश्रम घेतले़1402-2015-साई-01 सामुदायिक विवाहात कन्यादान करतांना शेळके बंधु,जेपीजे1402-2015-साई-01 सामुदायिक विवाह,जेपीजे