शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात तब्बल 276 भारतीयांना कोरोनाची लागण, एकट्या इराणमध्ये आढळले 255 रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 15:33 IST

इराणमधील कोम शहरात राहणाऱ्या एका यात्रेकरूने सार्वजनिक केलेल्या एका यादीनुसार, भारतीय डॉक्टरांनी तपासनी केल्यानंतर तब्बल 254 भारतीयांना कोरोनोची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

ठळक मुद्देयेथे भारतीय प्रवासी आणि विद्यार्थ्यांना गटा-गटांत वेगळे केले आहे.कोरोणाचा इराणमधील क्यूम भागाला सर्वाधिक फटका बसला आहे. भारतीयांच्या तपासणीसठी पुण्याहून डॉक्टरांचा एक चमू इराणमध्ये पाठवण्यात आला आहे

तेहरान/नवी दिल्ली : संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. याचा फटका आता भारतालाही बसायला सुरुवात झाली आहे. परदेशात तब्बल 276 भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यापैकी 255 जण एकट्या इराणमध्ये आढळून आले आहेत. तर 12 जण यूएईमध्ये आढळल्याची माहिती नुकतीच परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने लोकसभेत देण्यात आली.

चीननंतर कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका इटली आणि इराणला बसला आहे. यापूर्वी इराणमध्ये 254 भारतीयांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यात काही विद्यार्थी आणि प्रवासी नागरिकांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

इराणमधील कोम शहरात राहणाऱ्या एका यात्रेकरूने सार्वजनिक केलेल्या एका यादीनुसार, भारतीय डॉक्टरांनी तपासनी केल्यानंतर तब्बल 254 भारतीयांना कोरोनोची लागण झाल्याचे आढळून आल्याचे वृत्त होते. मात्र, आता खुद्द परराष्ट्र मंत्रालयानेच लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार हा आकडा 255 असल्याचे निश्चित झाले आहे.

कोरोनाची लागण झालेले अधिक जण कोम शहरातील -

येथे भारतीय प्रवासी आणि विद्यार्थ्यांना गटा-गटांत वेगळे केले आहे. यापैकी अधिक जण कोम शहरात आहेत, तर काही जण तेहराणमध्ये आहेत. येथील एकाने म्हटले आहे, की इराणमधील अधिकाऱ्यांनी सं​क्रमित असलेल्या लोकांना ते निगेटिव्ह असल्याचे सांगितले होते. 

कोरोणाचा इराणमधील क्यूम भागाला सर्वाधिक फटका बसला आहे. येथे भारतीय नागरिकांची तपासणी करण्यासठी पुण्याहून डॉक्टरांचा एक चमू पाठवण्यात आला आहे. यापूर्वी परराष्ट्रमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी म्हटले होते, की यासंदर्भात आम्ही तुर्तास कसल्याही प्रकारची पुष्टी करू शकत नाही. मात्र, या अधिकाऱ्यांनी असेही म्हटले होते, की अशा लोकांच्या यादीसंदर्भात त्यांना माहिती मिळाली आहे. मात्र ही यादी खरी आहे, की नाही यासंदर्भात सांगता येणार नाही.  इराणमध्ये कोरोना एवढ्या मोठ्या प्रमाणावर फैलावला आहे, त्यामुळे काही भारतीयांमध्ये पॉझिटीव्ह केसेस आढळतीलही. मात्र आम्ही आश्वासन देतो, की तेथील भारतीयांच्या संरक्षणासंदर्भात ईरान सरकारच्या मदतीने योग्य प्रकारे काम सुरू आहे. राजदुतांचेही या सर्व परिस्थितीवर लक्ष आहे, असे परराष्ट्रमंत्रालयाचे अतिरिक्त सचीव डी. रवी यांनी मंगळवारी म्हटले होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIranइराणIndiaभारत