शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 05:37 IST

काँग्रेस सरकारने प्रज्वलला देश सोडण्याची परवानगी दिल्याचा आणि वोक्कलिगातील निवडणुका संपल्यानंतर लैंगिक व्हिडीओ जारी केल्याचा आरोप मोदी यांनी केला.

बंगळुरू : कर्नाटक ‘सेक्स स्कँडल’वर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. हासन लोकसभा मतदारसंघाचे खासदार  प्रज्वल रेवण्णा यांच्या ‘सेक्स स्कँडल’चे व्हिडीओ असलेले  २५,००० पेन ड्राइव्ह राज्य सरकारने पोलिसांचा वापर करून निवडणुकीपूर्वी वाटले असल्याचा आरोप जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी केला आहे.

कुमारस्वामींनी याबाबत राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यावर कट रचल्याचा आरोप केला आहे, तसेच या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या कामकाजावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

एसआयटी पथक हे ‘सिद्धरामय्या तपास पथक’ आणि  ‘शिवकुमार तपास पथक’ आहे, असा आरोप कुमारस्वामी यांनी केला आहे. रेवण्णा आणि  प्रज्वल यांच्यावर लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रज्वलवरही बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पेन ड्राइव्हचे वाटप पोलिस अधिकाऱ्यांनी केले होते. त्यांना ‘तसे करण्यासाठी धमकी देण्यात आली होती. व्हिडीओ असलेला पेन ड्राइव्ह बेंगळुरू ग्रामीण मतदारसंघात वाटण्यात आले आहेत. येथे डीके शिवकुमार यांचे  भाऊ डीके सुरेश लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आहेत. ही घटना २१ एप्रिल रोजी घडली होती आणि २२ एप्रिल रोजी आमच्या एजंटने या संदर्भात तक्रार केली होती.    - एच.डी. कुमारस्वामी, नेते, जेडीएस

चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेले पथक निष्पक्ष तपास करत असून, राज्य सरकार त्यामध्ये थोडाही हस्तक्षेप करणार नाही. तपासाचे यश आता पूर्णपणे केंद्र सरकारच्या सहकार्यावर अवलंबून आहे. आरोपी प्रज्वल  हा परदेशात असल्याचे सांगण्यात येत असून त्याला भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने सहकार्य करावे. अजूनही भाजपची जेडीएससोबत राजकीय युती आहे. भाजपने याबाबत भूमिका स्पष्ट करावी.     - सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक

एसआयटी कोठडीत असलेले जेडीएस आ. एच. डी. रेवण्णा यांना विशेष न्यायालयाकडून दिलासा मिळू शकला नाही. न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी बुधवारपर्यंत पुढे ढकलली आहे.

रेवण्णांवर कठाेर  कारवाई व्हावी : मोदीnपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेडी (एस) खासदार रेवण्णांसारख्या व्यक्तींसाठी शून्य सहनशीलतेचे धोरण असायला हवे आणि प्रज्वल रेवण्णांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे मोदींनी म्हटले आहे. nकाँग्रेस सरकारने प्रज्वलला देश सोडण्याची परवानगी दिल्याचा आणि वोक्कलिगातील निवडणुका संपल्यानंतर लैंगिक व्हिडीओ जारी केल्याचा आरोपही त्यांनी केला. मोदींनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने या प्रकरणात कारवाई करणे ही राज्य सरकारची जबाबदारी असल्याचे सांगितले.

टॅग्स :h d deve gowdaएच. डी. देवेगौडाkumarswamyकुमारस्वामीNarendra Modiनरेंद्र मोदी