शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाराणसीच्या मुस्लिमबहुल भागात आढळले 250 वर्षे जुने शिवमंदिर; हिंदूंनी केली पूजेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 15:08 IST

जागा आमच्या मालकीची, पण हिंदूंनी पूजा करावी, आम्हाला हरकत नाही; मुस्लिम कुटुंबाची प्रतिक्रिया

Varanasi: उत्तर प्रदेशातील संभलनंतर आता वाराणसीच्या मुस्लिमबहुल मदनपुरा भागात जुने मंदिर सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. ही माहिती मिळताच सनातन रक्षक दलाने हे मंदिर उघडून तेथे पूजा करावी, असा अर्जही पोलिसांना केला आहे. पण, या जागेची मालकी आमच्याकडे असून, वडिलांनी 1931 मध्ये ही जागा विकत घेतल्याचा दावा मंदिराच्या शेजारील मुस्लिम व्यक्तीने केला आहे.  

सविस्तर माहिती अशी की, वाराणसीच्या दशाश्वमेध पोलीस स्टेशन हद्दीतील मदनपुरा भागात मुस्लिमांच्या घराला लागून एक मंदिर आहे. हे सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर असून, सुमारे अडीचशे वर्षे जुने असल्याचा दावा केला जातोय. मात्र गेल्या अनेक दशकांपासून मंदिर बंद आहे. माहिती मिळताच, सनातन रक्षक दलाकडून मंदिर उघडण्यासाठी पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. तसेच, मुस्लिमांनी मंदिरावर कब्जा केल्याचा दावा करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मंदिराबाहेर पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. 

मंदिरात पूजा करण्याची परवानगीमात्र, मंदिरालगतच्या मुस्लिम मालकाने कब्जा केल्याचा आरोपाचे खंडन केले आहे. त्यांनी सांगितले की, 1931 मध्ये त्यांच्या वडिलांनी ही जागा खरेदी केली होती. या जागेत त्यांचे घर आणि मंदिराचा भाग त्यांच्याकडे आला. एवढंच नाही, तर आम्ही वेळोवेळी मंदिराची डागडुजी, साफसफाई, रंगरंगोटीची कामे करत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, हिंदूंना या मंदिरात पूजा करायची असेल, तर आम्ही त्यांचे स्वागत करू, आम्हाला कोणतीही अडचण नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

मुस्लिम व्यक्तीने काय म्हटलेमंदिराच्या मालकीचा दावा करणाऱ्या मुस्लिम कुटुंबातील मोहम्मद झाकी सांगतात की, आमच्या वडिलांनी जागा घेतली, तेव्हा मंदिर बंद होते. वडील आणि काकासह आमची चार कुटुंबे येथे राहत होती. घर आणि मंदिराची कागदपत्रे आमच्याकडे आहेत, पण कुठे ठेवलीत, हे आमचे काका सांगू शकतात. मंदिर बंद करून ताब्यात घेतल्याचा दावा करणे चुकीचे आहे. या मंदिराचेही आम्ही मालक आहोत. आमच्या आजूबाजूला भरपूर प्रमाणात हिंदू लोकसंख्या आहे आणि सर्व लोक एकत्र राहतात. बनारसमध्ये रस्ता रुंदीकरणादरम्यान अनेक मंदिरे पाडण्यात आली, पण कोणीही काही बोलले नाही. तुमची श्रद्धा असेल, तर इथे येऊन पूजा करा, आमची हरकत नाही. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशVaranasiवाराणसीTempleमंदिरHinduहिंदूMuslimमुस्लीम