२५० वर्षीय दुर्मीळ रुद्राक्षांचे त्र्यंबकेश्वरला दर्शन
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:23+5:302015-09-01T21:38:23+5:30
श्रीश्री १००८ श्रीमहंत धर्मप्रकाश महाराजांनी जमविले ५१ हजार रुद्राक्ष

२५० वर्षीय दुर्मीळ रुद्राक्षांचे त्र्यंबकेश्वरला दर्शन
श रीश्री १००८ श्रीमहंत धर्मप्रकाश महाराजांनी जमविले ५१ हजार रुद्राक्ष त्र्यंबकेश्वर : श्री श्री १००८ श्रीमहंत अजितमल गद्दीनशीन श्रीश्री १०८ श्रीमहंत धर्मप्रकाश महाराज यांनी जमविलेल्या ५१ हजार रुद्राक्षांच्या दर्शन सोहळ्याचे उद्घाटन मंगळवारी त्र्यंबकेश्वर येथे झाले. हे रुद्राक्ष २५० वर्षांपूर्वीचे असून, या सोहळ्याचे उद्घाटन उदासिन बडा आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर श्रीकार्ष्णि गुरू शरणानंद यांच्या हस्ते झाले.धर्मप्रकाश पूर्वी येथील श्री पंचायती उदासिन आखाड्याचे महात्मा म्हणून त्र्यंबकेश्वरला वास्तव्यास होते. त्यानंतर ते उदासिन आखाड्याचे मुख्यालय असलेल्या हरिद्वार येथून श्री श्री १००८ श्रीमहंत अजितमल साहेब गद्दी नशीन उदासिन आश्रम (ट्रस्ट) श्री संगत फतेहपूर, जि. सुलतानपूर, उत्तर प्रदेश येथील आश्रम व गादी सांभाळीत आहेत. मुळातच अभ्यासूवृत्ती यामुळे आज ते श्री श्री १००८ या पदवीने सन्मानित आहेत. सुमारे २५० वर्षांहून दुर्मीळ १ ते १४ मुखी ५१००० रुद्राक्षांचे दर्शन करवित आहेत. सुमारे १ महिना ते भाविकांसाठी दर्शनार्थ ठेवणार आहेत. आजच्या या रुद्राक्ष दर्शन स्थळासाठी श्रीकार्ष्णि गुरू शरणानंद यांच्या व्यतिरिक्त आचार्य महामंडलेश्वर ज्ञानानंद, अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी, श्री स्वामी सागरानंद सरस्वती, शिवानंद, सहदेवमुनी, श्रीमहंत धनराजगिरी, रमणमुनी, शिरसाठ , सुनील सोनी, अनिल कासट, पुरोहित कैलास देवकुटे, अनंत देवकुटे, उदय दीक्षित आदि ११ ब्रााणांनी पौरोहित्य केले. यावेळी युवतींचे लेजीम पथम स्वागतासाठी छत्रचामर, वाजंत्री आदि व्यवस्था करण्यात आली होती.