तुरुंगात असलेल्या डेरा प्रमुख राम रहीमला पाठवल्या 25 हजार राख्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 10:44 IST2021-08-20T10:44:08+5:302021-08-20T10:44:25+5:30
Haryana News: गेल्या 19 दिवसांत राम रहिमला 25 हजारांहून अधिक राखी पोस्टाने पाठवण्यात आल्या आहेत.

तुरुंगात असलेल्या डेरा प्रमुख राम रहीमला पाठवल्या 25 हजार राख्या
रोहतक: बलात्कार आणि हत्या प्रकरणात हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील सुनारिया कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला हजारो राख्या पाठवल्या जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 19 दिवसांत राम रहिमला 25 हजारांहून अधिक राखी पोस्टाने पाठवण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, हत्या प्रकरणात हिसारच्या मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या करौंठा आश्रम प्रमुख रामपालसाठी 25 राख्या आल्या आहेत.
रविवारी राखी देण्यासाठी डाक विभागानं विशेष वितरण सेवा सुरू केली आहे. हरियाणामध्ये 850 पोस्टमन आणि टपाल विभागाचे 2,190 ग्रामीण डाक सेवक राखी वितरीत करण्यासाठी कार्यरत आहेत. पोस्टमन सुमारे दीड तास अधिक म्हणजे संध्याकाळी 6:30 पर्यंत राखी देण्यासाठी ड्युटी देत आहे.
दैनिक भास्करच्या बातमीनुसार, हरियाणाचे मुख्य पोस्ट मास्टर जनरल रंजू प्रसाद यांनी सांगितले की, 1 ते 19 ऑगस्टपर्यंत टपाल खात्यानं 2.95 लाख राखी वितरित केल्या आहेत, तर गेल्या वर्षी 2.78 लाख राखी वितरित केल्या होत्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वेळी टपाल खात्याकडून वाहतूक 25% वाढली आहे.