ओडिसामध्ये बस दरीत कोसळून २५ ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2016 23:21 IST2016-04-17T23:13:55+5:302016-04-17T23:21:27+5:30
ओडिसामधील देवगड जिल्ह्यात बस दरीत कोसळून २५ जण ठार झाले असून अनेक जखमी झाल्याची घटना घडली.

ओडिसामध्ये बस दरीत कोसळून २५ ठार
ऑनलाइन लोकमत
भुवनेश्वर, दि. १७ - ओडिसामधील देवगड जिल्ह्यात बस दरीत कोसळून २५ जण ठार झाले, तर अनेक जखमी झाल्याचे वृत्त आहे. ओपेरा ग्रुपचे सर्व कलाकार या बसमधून आपल्या गावी बारगडला जात असताना देवगड जिल्ह्यातील ३०० फूट खोल दरीत बस कोसळून हा अपघात झाला. या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले असल्याची माहिती पोलीस अधिक्षक सारा शर्मा यांनी दिली. तसेच, या अपघातातील जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.