२५... कामठी... अपघात

By Admin | Updated: June 25, 2015 23:51 IST2015-06-25T23:51:14+5:302015-06-25T23:51:14+5:30

(फोटो)

25 ... Kamathi ... accident | २५... कामठी... अपघात

२५... कामठी... अपघात

(फ
ोटो)
कारच्या धडकेत तरुण जखमी
रनाळा शिवारातील घटना : गुन्हा दाखल
कामठी : भरधाव कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना कामठी - कळमना मार्गावरील रनाळा शिवारात गुरुवारी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास घडली.
दिनेश रामदास अमृते (२६, रा. खंडाळा-चाचेर, ता. मौदा) असे जखमी तरुणाचे नाव आहे. दिनेश एमएच-४०/एएफ-३७४९ क्रमांकाच्या मोटरसायकलने नागपूरहून कळमनामार्गे चाचेरकडे जात होता. दरम्यान, रनाळा शिवारात कामठीहून नागपूरकडे भरधाव जाणाऱ्या एमएच-३१- सीआर-८५२१ क्रमांकाच्या कारने जोरदार धडक दिली. यात दिनेश गंभीर जखमी झाला. त्यातच चालकाचा ताबा सुटल्याने ही कार रोडच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली.
नागरिकांकडून माहिती मिळताच कामठी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दिनेशला कामठीतील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. अपघात होताच कारचालक पळून गेला. या प्रकरणी कामठी पोलिसांनी भादंवि २७९, ३३८ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
***

Web Title: 25 ... Kamathi ... accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.