शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
2
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
3
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
4
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
5
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
6
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
7
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
8
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
9
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
10
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
11
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
12
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
13
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
14
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

भाजपाच्या 24 नेत्यांना केंद्र सरकारकडून VIP सुरक्षा; 'या' नेत्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 2:27 PM

VIP Security : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नेत्यांना निवडणुकीपर्यंत ही सुरक्षा देण्यात आली आहे. निवडणुकीनंतर त्यांच्या सुरक्षेचा पुन्हा आढावा घेतला जाईल.

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाच राज्यांमध्ये कडोकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, निवडणुकीतील धोका लक्षात घेता केंद्र सरकारने जवळपास 24 भाजपा नेत्यांना व्हीआयपी सुरक्षा पुरवली आहे. हे नेते पंजाब आणि उत्तर प्रदेशातील आहेत. आता त्यांच्या सुरक्षेत सीआरपीएफ (CRPF) आणि सीआयएसएफचे (CISF) जवान तैनात करण्यात आले आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या नेत्यांना निवडणुकीपर्यंत ही सुरक्षा देण्यात आली आहे. निवडणुकीनंतर त्यांच्या सुरक्षेचा पुन्हा आढावा घेतला जाईल. सुखविंदर सिंग बिंद्रा, परमिंदर सिंग धिंडसा, अवतार सिंग झिरा, निमिषा टी मेहता, सरदार दीदार सिंग भाटी, सरदार कंवर वीर सिंग तोहरा, सरदार गुरप्रीत सिंग भाटी आणि सरदार हरियत कमल हे व्हीआयपी सुरक्षा मिळालेल्या नेत्यांमध्ये प्रमुख आहेत. 

दरम्यान, गोवा, मणिपुर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका सुरू आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाच राज्यांमध्ये कडोकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, काही नेत्यांना व्हीआयपी सुरक्षा पुरवण्यात आली आहे. 

कशी मिळते व्हीआयपी सुरक्षा?केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारे व्हीआयपी सुरक्षा प्रदान केली जाते. कारण पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहेत. निवडणुकीच्या काळात नेत्यांच्या सुरक्षेशी संबंधित धोका असतो, त्यामुळे काही लोकांना निवडणुकीपर्यंत व्हीआयपी सुरक्षा दिली जाते. व्हीआयपी संरक्षणाखाली सहा श्रेणी आहेत. यामध्ये एक्स (X), व्हाय (Y), व्हाय-प्लस (Y-Plus), झेड (Z), झेड-प्लस (Z-Plus) आणि स्पेशन प्रोटेक्शन ग्रुप (Special Protection Group-SPG) यांचा समावेश आहे. यापैकी, एसपीजी (SPG) केवळ पंतप्रधानांची सुरक्षा प्रदान करते, तर इतर सुरक्षा श्रेणींची सुरक्षा गुप्तचर विभागाच्या इनपुटच्या आधारे कोणत्याही व्यक्तीला प्रदान केली जाऊ शकते. प्रत्येक श्रेणीतील सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या वेगळी आहे.