सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २३७८ कोटींचा आराखडा

By Admin | Updated: December 16, 2014 23:44 IST2014-12-16T23:44:15+5:302014-12-16T23:44:15+5:30

नागपूर: नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २ हजार ३७८ कोटी ७८ लाख रुपयांचा विभागनिहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखड्यानुसार निर्धारित वेळेत कामे पूर्ण करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

2378 crore plan for Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २३७८ कोटींचा आराखडा

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २३७८ कोटींचा आराखडा

गपूर: नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २ हजार ३७८ कोटी ७८ लाख रुपयांचा विभागनिहाय आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखड्यानुसार निर्धारित वेळेत कामे पूर्ण करा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
१४ जुलै ते १९ ऑगस्ट २०१५ या दरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पूर्व तयारीसंदर्भात एक बैठक सोमवारी नागपूर येथे झाली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यांनी पूर्वतयारीच्या कामाचा आढावा घेतला. साधुग्राम तयार करण्यासाठी ३२५ एकर जागेचे तात्पुरते अधिग्रहण करावे लागणार आहे. यासाठी न्यायालयात प्रलंबित प्रकरणात राज्याचे महाअधिवक्ता सरकारची बाजू मांडतील. तसेच कुंभमेळ्यासाठी आठ घाट तयार करण्यात येतील व नदी पात्रातील स्वच्छतेला प्राधान्य दिले जाईल, असे सांगितले. बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय व इतरही वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महाजन यांच्याकडे जबाबदारी
कुंंभमेळ्याच्या आयोजनाची तसेच पूर्वतयारीची जबाबदारी प्रभारी मंत्री म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

Web Title: 2378 crore plan for Simhastha Kumbh Mela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.