शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 11:21 IST

Cricketer Dirgh Patel Died: अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात एका २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद झालेल्या भीषण विमान अपघाताच्या दुर्घटनेनं संपूर्ण जगाला हादरवून सोडलं आहे. या विमान अपघातात २७० हून अधिक जणांना आपला जीव गमावला आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच ते कोसळलं आणि त्याने पेट घेतला. त्यामुळे विमानासह आजूबाजूचा परिसर भस्मसात झाला. या विमानात एका प्रवाशाला सोडून सर्वांचा जीव गेला. या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला. आता या विमान अपघातात एका २३ वर्षीय क्रिकेटपटूचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

अहमदाबादमध्येएअर इंडियाचे विमान एआय-१७१ कोसळल्यानंतर शेकडो कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. एअर इंडियाचे विमान दुपारी १.३८ वाजता लंडनला निघाले. उड्डाणानंतर काही सेकंदातच विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलला धडकले आणि विमानातील प्रवाशांसह २७० हून अधिकजण मृत्यूमूखी पडले. यामध्ये एका तरुण क्रिकेटपटूचाही समावेश असल्याचे समोर आलं आहे. मृत्युमुखी पडलेल्या २७० जणांमध्ये २३ वर्षीय क्रिकेटपटू दीर्घ पटेल याचाही समावेश होता. दीर्घ पटेलने हडर्सफील्ड विद्यापीठातही शिक्षण घेतले होते. त्याने आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये एमएससी पूर्ण केले होते.

बीबीसी आणि एअरडेल अँड व्हार्फेडेल सीनियर क्रिकेट लीगनुसार, दीर्घ पटेल अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाच्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २४१ प्रवाशांपैकी एक होता. २०२४ मध्ये दीर्घ हा लीड्स मॉडर्नियन्स सीसीचा खेळाडू होता. त्याने २० सामन्यांमध्ये ३१२ धावा केल्या आणि २९ विकेट्स घेतल्या होत्या. त्याच वर्षी त्याने पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. त्याच्या निधनाची बातमी ऐकून क्लबलाही खूप दुःख झाले आहे. मूळचा गुजरातचा रहिवासी असलेला दीर्घ पटेलचा नवीन नोकरीत स्थिरावल्यानंतरही खेळण्याचा मानस होता, असं  एअरडेल अँड व्हार्फेडेल सीनियर क्रिकेट लीगच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

हडर्सफील्ड विद्यापीठातील एका प्राध्यापकाने सांगितले की, "दिर्घ पटेल हा एक मुलगा होता जो त्याच्या शैक्षणिक क्षमतेसाठी, प्रेमळपणासाठी आणि आवडीसाठी ओळखला जात होता. त्याला नेहमीच अभ्यासाबद्दल उत्सुकता असायची. तो वर्गात येऊन मला प्रश्न विचारत होता ज्यावरून त्याची आवड दिसून येत होती."

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाahmedabadअहमदाबादAir Indiaएअर इंडियाDeathमृत्यूcricket off the fieldऑफ द फिल्ड