२२... वाडी... आरक्षण
By Admin | Updated: January 23, 2015 01:04 IST2015-01-23T01:04:07+5:302015-01-23T01:04:07+5:30
वॉर्डांचे आरक्षण जाहीर

२२... वाडी... आरक्षण
व र्डांचे आरक्षण जाहीर वाडी नगर परिषद निवडणूक : एकूण २५ वॉर्डांची निर्मितीवाडी : नव्याने निर्माण करण्यात आलेल्या वाडी नगर परिषदेची पहिली निवडणूक येत्या ३ फेबु्रवारी रोजी वॉर्ड पद्धतीने होत आहे. त्या अनुषंगाने येथील सर्व वॉर्डांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. येथील एकूण २५ वॉर्डांपैकी अनुसूचित जाती व इतर मागास प्रवर्गासाठी प्रत्येकी ७, खुल्या प्रवर्गासाठी १० आणि अनुसूूचित जमातीसाठी एक वॉर्ड आरक्षित करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रशांत पाटील व सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार तेजस्विनी जाधव यांनी संयुक्तरीत्या दिली.वॉर्ड आरक्षण सोडत नागपूर तहसील कार्यालयात बुधवारी दुपारी पार पडली. सर्वप्रथम अनुसूचित जातींसाठी लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार सात वॉर्ड राखीव करण्यात आले. वॉर्ड क्रमांक - १९ , २०, २४ व २५ (भाजीमंडी) हे चार वॉर्ड अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव करण्यात आले असून, वॉर्ड क्रमांक - १२, २२ व २३ हे तीन वॉर्ड अनुसूचित पुरुषांसाठी राखीव करण्यात आले आहे.वॉर्ड क्रमांक - ३ अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आला. त्यावर श्याम मंडपे यांनी आक्षेप नोंदविला. इतर मागास प्रवर्गासाठी सात वॉर्ड राखीव करण्यात आले असून, वॉर्ड क्रमांक - ६, १७, १८ व २१ या चार जागा महिलांसाठी सोडण्यात आल्या आहे. उर्वरित वॉर्ड क्रमांक - ४, ५ व १३ या तीन जागा ओबीसी पुरुषांच्या वाट्याला आल्या. खुल्या प्रवर्गासाठी १० जागा आरक्षित करण्यात आल्या असून, त्यात वॉर्ड क्रमांक ५, २, ९, १० व १४ हे पाच वॉर्ड महिला आणि वॉर्ड क्रमांक - १, ७, ८, १५ व १६ हे पाच वॉर्ड पुरुषांसाठी सोडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, प्रेम झाडे, नरेश चरडे, श्याम मंडपे, हर्षल काकडे, रुपेश झाडे, प्रकाश कोकाटे, भीमराव लोखंडे, दुर्योधन ढोणे, अशोक माने, राजेश जिरापुरे यांची निवासस्थाने असलेले वॉर्ड महिलांसाठी राखीव करण्यात आले आहेत. गोविंद रोडे, मधू मानके, दिनेश बन्सोड, प्रा. सुभाष खाकसे प्रमिला पवार, बेबी ढबाले यांना मात्र या आरक्षणामुुळे दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)***