22 नक्षलवाद्यांचा खात्मा; 31 मार्च 2026 पूर्वी भारत नक्षलमुक्त होणार, अमित शाहांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 15:44 IST2025-03-20T15:43:46+5:302025-03-20T15:44:36+5:30

छत्तीसगडच्या विजापूर-दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दलांनी 22 नक्षलवाद्यांना ठार केले.

22 Naxalites killed in Chhattisgarh; India will be Naxal-free before March 31, 2026, Amit Shah announces | 22 नक्षलवाद्यांचा खात्मा; 31 मार्च 2026 पूर्वी भारत नक्षलमुक्त होणार, अमित शाहांची घोषणा

22 नक्षलवाद्यांचा खात्मा; 31 मार्च 2026 पूर्वी भारत नक्षलमुक्त होणार, अमित शाहांची घोषणा

Amit Shah on Naxalite : केंद्र सरकारच्या नक्षलवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गुरुवारी(20 मार्च 2025) छत्तीसगडच्या विजापूर-दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दलांनी 22 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. चकमकीत एक जवानही शहीद झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या मोहिमेबद्दल माहिती दिली आण 31 मार्च 2026 पूर्वी देश नक्षलमुक्त होईल, असा विश्वासही व्यक्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासून छत्तीसगडच्या गांगलूर पीएस हद्दीजवळील विजापूर-दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. दोन्ही बाजूंनी बेच्छूट गोळीबार झाला, ज्यात सुरक्षा दलांनी चकमकीत 22 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. चकमकीनंतर सुरक्षा दलाने 22 नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त केली. दुःखद बाब म्हणजे, या चकमकीत विजापूर डीआरजीचा 1 जवान शहीद झाला आहे. 

अमित शाह काय म्हणाले?
सुरक्षा दलांला मिळालेल्या या यशाबद्दल गृहमंत्री अमित शाहांनी सोशल मीडिया हँडल X वर पोस्ट केली. ते म्हणाले, नक्षलमुक्त भारत मोहिमेच्या दिशेने आज आपल्या जवानांनी आणखी एक मोठे यश मिळवले आहे. छत्तीसगडच्या विजापूर आणि कांकेरमध्ये आमच्या सुरक्षा दलांनी दोन वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये 22 नक्षलवादी ठार केले. मोदी सरकार नक्षलवाद्यांविरोधात 'झिरो टॉलरन्स' ठेवून पुढे जात आहे. भारत देश पुढील वर्षी 31 मार्चपूर्वी नक्षलमुक्त होईल, अशी प्रतिक्रिया अमित शाहांनी दिली.

Web Title: 22 Naxalites killed in Chhattisgarh; India will be Naxal-free before March 31, 2026, Amit Shah announces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.