शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

डिसेंबरपर्यंत 216 कोटी डोस! प्रत्येकाला मिळणार लस; उत्पादन क्षमता वाढवणार - निती आयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 6:06 AM

डॉ. पॉल यांनी सांगितले की, फायझर, मॉडेर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन यांच्या लसी भारतात याव्यात यासाठी परराष्ट्र खाते या कंपन्यांच्या संपर्कात आहे.

नवी दिल्ली : येत्या ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत देशात कोरोना लसींच्या २१६ कोटी डोसचे उत्पादन होणार असून त्यांचा उपयोग पूर्णपणे भारतीय नागरिकांसाठीच केला जाईल. आगामी काळात प्रत्येकाला लस उपलब्ध होणार आहे, असे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले.डॉ. पॉल म्हणाले की, देशातील ४५ वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोमानाच्या व्यक्तींपैकी १/३ लोकांना आता कोरोनापासून संरक्षण मिळाले आहे. देशात आतापर्यंत कोरोना लसींचे १८ कोटी डोस देण्यात आले आहेत. अमेरिकेने नागरिकांना २६ कोटी डोस दिले असून ती याबाबत पहिल्या क्रमांकावर तर भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

डॉ. पॉल यांनी सांगितले की, फायझर, मॉडेर्ना, जॉन्सन अँड जॉन्सन यांच्या लसी भारतात याव्यात यासाठी परराष्ट्र खाते या कंपन्यांच्या संपर्कात आहे. डोस पाठविणार की भारतात त्यांचे उत्पादन करणार अशी विचारणा या कंपन्यांना केंद्र सरकारने केली होती. आम्ही लसींच्या उत्पादनाबाबत संबंधितांचे सहकार्य घेणार आहोत. 

    इतर कंपन्याही बनविणार कोव्हॅक्सिन-  कोव्हॅक्सिन ही लस बनविण्याचा फॉर्म्युला इतर कंपन्यांना देण्याची तयारी भारत बायोटेकने दाखविली आहे. -  देशात कोरोना लसींचे आणखी मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी भारत बायोटेककडे तशी मागणी अनेक राज्यांनी केली होती. देशात लसीकरण मोहिमेत कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन लसी सध्या वापरण्यात येत आहेत.

रशियाने बनविलेली स्पुतनिक व्ही लस भारतात दाखल झाली आहे. ही लस पुढच्या आठवड्यात बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध होईल.     - डॉ. व्ही. के. पॉल, सदस्य, नीती आयोग

कोरोनातून बरे झालेल्यांना सहा महिन्यांनी लस, विशिल्डबाबत शिफारसकोरोना संसर्गातून बरे झालेल्या व्यक्तीने त्यानंतर सहा महिन्यांनी कोविशिल्डची लस घ्यावी, अशी शिफारस लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने केली आहे. भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीच्या दोन डोसमध्ये असलेले पूर्वीचे अंतर बदलण्याची शिफारस करण्यात आलेली नाही.-  कोविशिल्डच्या दोन डोसमध्ये १२ ते १६ आठवड्यांचे अंतर असावे. -  गरोदर महिलेने कोविशिल्ड व कोवॅक्सिन यापैकी कोणतीही लस घ्यावी. बाळंतपणानंतर केव्हाही कोरोना लस घेऊ शकते. -  या शिफारशी आता तज्ज्ञ समितीसमोर मांडल्या जातील. त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल.-  कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर पूर्वी २८ दिवसांचे होते. ते सहा ते आठ आठवडे करण्यात आले. 

लसींचे डिसेंबरपर्यंतचे उत्पादनकोविशिल्ड -    ७५ कोटीकोव्हॅक्सिन -    ५५ कोटीबायो ई सब युनिट -    ३० कोटीझायडस कॅडिला डीएनए -    ०५ कोटीएसआयआय-नोवाव्हॅक्स -    २० कोटीबीबी नोझल व्हॅक्सिन -      १० कोटीजिनोव्हा एमआरएनए     - ६ कोटीस्पुतनिक -    १५.६० कोटी एकूण -    २१६ कोटी 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरOxygen Cylinderऑक्सिजनState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेNIti Ayogनिती आयोग