शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 10:02 IST

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये १२ जून रोजी घडलेल्या एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २७० लोकांपैकी २१५ मृतदेहांची ओळख पटली.

अहमदाबाद: अहमदाबादमध्ये १२ जून रोजी घडलेल्या एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २७० लोकांपैकी, आजपर्यंत २१५ मृतदेहांची ओळख डीएनए चाचणीद्वारे पटवण्यात आली असून त्यातील १९८ मृतदेह नातेवाइकांच्या हवाली करण्यात आले. ही माहिती एका अधिकाऱ्याने गुरुवारी दिली.

लंडनकडे निघालेल्या एअर इंडिया फ्लाईट एआय-१७१मध्ये २४२ प्रवासी व कर्मचारी होते. हे विमान उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच अहमदाबादच्या मेघाणीनगर भागातील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहावर कोसळले आणि भीषण आगीत भस्मसात झाले. विमानातील एक व्यक्ती वगळता बाकी सर्व लोकांचा मृत्यू झाला. तसेच वसतिगृह परिसरातील २९ लोकही मरण पावले. 

एअर इंडियाचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन यांनी गुरुवारी सांगितले की, अपघातग्रस्त बोईंग ७८७-८ ड्रीमलाइनर या विमानाची व्यवस्थित देखभाल करण्यात येत होती. जून २०२३मध्ये त्याची बारकाईने तपासणी करण्यात आली होती. तसेच पुढील तपासणी डिसेंबर २०२५मध्ये होणार होती. विमानाचे उजवे इंजिन यंदाच्या वर्षी मार्चमध्ये, तर डावे इंजिन एप्रिलमध्ये तपासण्यात आले होते. तसेच उड्डाणापूर्वी या विमानात कोणताही दोष आढळून आला नव्हता. 

एअर इंडिया विमानाला झालेल्या अपघाताला एक आठवडा उलटला असला तरी विमानाच्या शेपटासह अन्य अवशेषांचा ढिगारा अद्याप अपघातस्थळी तसाच पडून आहे. या दुर्घटनेच्या तपासाचे काम गुजरात सरकारकडे नसून त्यांचे अग्निशमन कर्मचारी, न्यायवैद्यकीय तज्ज्ञ केंद्राच्या यंत्रणांना मदत करणार आहेत. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाAir Indiaएअर इंडिया