मंचरला २१0 जणांची आरोग्य तपासणी
By Admin | Updated: August 31, 2015 00:24 IST2015-08-31T00:24:31+5:302015-08-31T00:24:31+5:30
मंचर : माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात रविवारी आरोग्य शिबिर पार पडले. शिबिरात २१० व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली.

मंचरला २१0 जणांची आरोग्य तपासणी
म चर : माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात रविवारी आरोग्य शिबिर पार पडले. शिबिरात २१० व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली.मंचर उपजिल्हा रुग्णालयात लाला अर्बन को-ऑप बँक लि. व सुविधा हॉस्पिटल चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन लाला अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुनीता साकोरे व ज्येष्ठ संचालक प्रल्हाद बाणखेले यांच्या हस्ते झाले. आरोग्य शिबिरात २१० व्यक्तींची रक्तदाब, ईसीजी, मधुमेह आदींची तपासणी करण्यात आली. डॉ. पूनम साकोरे व त्यांच्या सहकार्यांनी तपासणी केली.शिबिरप्रसंगी लाला बँकेच्या संचालिका मधुराबाई बाणखेले, तात्या गुंजाळ, सचिन कांकरिया, सचिन कांबळे, नारायण गाढवे, कैलास बाणखेले, बबनराव साकोरे, माजी सरपंच लक्ष्मण गांजाळे, बाळासाहेब बाणखेले, युवराज बाणखेले, मंगेश बाणखेले आदी उपस्थित होते.शंकरमहाराज शेवाळे यांनी प्रास्ताविक केले. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश पाटील यांनी आभार मानले.