आदर्श पतसंस्थेस २१ लाखांचा नफा : परीट
By Admin | Updated: May 12, 2014 21:54 IST2014-05-12T21:54:35+5:302014-05-12T21:54:35+5:30
पेठवडगाव : मिणचे (ता. हातकणंगले) येथील आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेस आर्थिक वर्षात २१ लाखांचा नफा झाल्याचे अध्यक्ष मनोहर परीट यांनी सांगितले.

आदर्श पतसंस्थेस २१ लाखांचा नफा : परीट
प ठवडगाव : मिणचे (ता. हातकणंगले) येथील आदर्श ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेस आर्थिक वर्षात २१ लाखांचा नफा झाल्याचे अध्यक्ष मनोहर परीट यांनी सांगितले.परीट म्हणाले, आदर्श ग्रामीण पतसंस्था ग्रामीण भागात कार्यरत आहे. दत्तात्रय घुगरे, संजय देसाई यांच्या सहकार्याने सभासद व ठेवीदारांसाठी अनेक योजना राबविल्या. त्यामुळे संस्थेने स्वमालकीची इमारत पूर्णत्वास येत आहे. चालू आर्थिक वर्षात संस्थेने ३ कोटी ५० लाखांच्या ठेवी संकलित केलेल्या आहेत. तसेच कर्जाचे २ कोटी ३३ लाखांचे वितरण केलेले आहे. विशेष म्हणजे थकबाकी शून्य टक्के आहे. मिणचे येथे संस्थेच्यावतीने आदर्श बझार सुरू करणार आहे.प्रतिनिधी.