२१... भिवापूर

By Admin | Updated: January 22, 2015 00:07 IST2015-01-22T00:07:32+5:302015-01-22T00:07:32+5:30

कार्यवाही अहवाल पाठविण्यास टाळाटाळ

21 ... Bhivapur | २१... भिवापूर

२१... भिवापूर

र्यवाही अहवाल पाठविण्यास टाळाटाळ
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष : वृद्ध दुकानदाराचा १२ वर्षांपासून संघर्ष सुरू
भिवापूर : शहरात १२ वर्षांपूर्वी राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत आबादी जागेवरील वृद्धाचे जोडे-चपला दुरुस्तीचे दुकान हटविण्यात आले. या काळात प्रशासनाने त्या वृद्धाला व्यवसायासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून दिली नाही. सदर प्रकरण निकाली काढण्यासाठी उमरेडचे उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांनी या जागेची प्रत्यक्ष पाहणी करीत भिवापूर येथील तलाठ्याला काही निर्देश दिले. त्या निर्देशावर काय कार्यवाही करण्यात आली, याबाबत तलाठ्याने उपविभागीय कार्यालयाला अद्यापही अहवाल सादर केला नाही.
रामभाऊ पंचम तासकर (६५, रा. भिवापूर) यांचे भिवापूर येथील जुन्या आबादीतील सर्व्हे क्र. १५५ मधील खुल्या जागेवर लाकडी ठेलावजा दुकान होते. तिथे ते जोडे-चपलांची दुरुस्ती व विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. दरम्यान, १२ वर्षांपूूर्वी महसूल विभागाने या जागेवरील अतिक्रमण हटविले. त्यात राममभाऊ तासकर यांचे दुकानही हटविण्यात आले. ही जागा महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी कार्यालयासाठी प्रस्तावित असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. वास्तवात त्या जागेवर मंडळ अधिकारी कार्यालयाची इमारत अद्यापही बांधण्यात आली नाही. सदर कार्यालय तहसील कार्यालयात आहे.
रामभाऊ तासकर यांनी हार न मानता प्रशासनाविरुद्ध संघर्ष सुुरू केला. हा भूखंड आपल्याला मिळावा, यासाठी तासकर यांनी वेळोवेळी महसूल विभागाला अर्ज दिले. त्या अर्जांचा पाठपुरावाही त्यांनी नियमितपणे केला. दरम्यान, महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या या संघर्षाची दखल घेतली. सदर भूखंड रामभाऊ तासकर यांना बांधकामासाठी देण्यात यावा, असा निर्णय तत्कालीन विभागीय उपायुक्त खान आणि उपजिल्हाधिकारी दिलीप सावरकर यांनी दिला. सदर भूखंडाचे मूल्यांकन करण्यात यावे, या मूल्यांकनानुसार आकारण्यात आलेली रक्कम मागणीकर्ता भरण्यास तयार असल्यास त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घ्यावे, असेही या अधिकाऱ्यांनी पत्राद्वारे कळविले होते.
यावर संबंधित स्थानिक अधिकारी काहीही कार्यवाही करायला तयार नसल्याने तासकर यांनी उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांच्यासमोर व्यथा मांडली. त्यामुळे काळे यांनी १० डिसेंबर २०१४ रोजी प्रत्यक्ष मोक्कापाहणी केली. या प्रकरणी अहवाल ततयार करून तो सादर करण्याचे निर्देशही त्यांनी कर्मचाऱ्यांना दिले होते. त्यावेळी स्थानिक तलाठी आणि भूमापन विभागाचे अधिकारी हजर होते.

Web Title: 21 ... Bhivapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.