शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

शिक्षण संस्थाच नव्हे तर RBI, LIC आणि सरकारी बँक कर्मचार्‍यांच्या पगारातून 'पीएम केअर्स'साठी २०५ कोटी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 12:40 IST

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर २८ मार्चला पीएम केअर्स फंडची स्थापना करण्यात आली. या फंडमध्ये ३१ मार्चपर्यंत ३,०८६.६२ कोटी रुपये जमा झाले आहेत.

ठळक मुद्देआरटीआयला उत्तर देणाऱ्या १५ सरकारी बँका आणि संस्थांकडून पीएम केअर्स फंडमध्ये एकूण ३४९.२५ कोटी रुपये आहे.

नवी दिल्ली : पीएम केअर्स फंडमध्ये फक्त केंद्रीय शैक्षणिक संस्थाच नव्हे तर कमीतकमी सात सार्वजनिक बँका, सात इतर प्रमुख वित्तीय संस्था व विमा कंपन्या आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने मिळून २०४.७५ कोटी रुपये जमा केले आहेत. ही मोठी रक्कम या सर्व कर्मचार्‍यांच्या पगारामधून कपात करून पीएम केअर्स फंडमध्ये ट्रान्सफर करण्यात आली आहे.

'द इंडियन एक्सप्रेस'द्वारे मागितलेल्या आरटीआय रेकॉर्ड्सच्या तपासणीत हे उघडकीस आले आहे. आरटीआय रेकॉर्ड्सच्या माहितीनुसार, एलआयसी, जीआयसी आणि नॅशनल बँकेने जवळपास १४४.५ कोटी रुपये पीएम केअर्स फंडमध्ये दिले आहेत. ही रक्कम कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) वाटप आणि इतर तरतुदी व्यतिरिक्त दिली आहे.

आरटीआयला उत्तर देणाऱ्या १५ सरकारी बँका आणि संस्थांकडून पीएम केअर्स फंडमध्ये एकूण ३४९.२५ कोटी रुपये जमा झाले आहेत. तर आरटीआयला उत्तर देणार्‍या सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि संस्थांच्या यादीमध्ये सर्वात जास्त रक्कम एलआयसीने पीएम केअर्स फंडला दिली आहे. ही रक्कम ११३.६३ कोटी आहे. दरम्यान, ही रक्कम विविध श्रेणींच्या माध्यमातून देण्यात आली आहे. यामध्ये कर्मचार्‍यांच्या पगारामधून ८.६४ कोटी रुपये, कॉर्पोरेट कम्युनिकेशनच्या अंतर्गत १०० कोटी आणि 'गोल्डन ज्युबिली फाउंडेशन'च्या अंतर्गत ५ कोटी रुपये देण्यात आली आहे.

पीएम केअर्स फंडसाठी एलआयसीने १०० कोटी रुपयांचा निधी ३१ मार्चला दिला होता. तर पाच कोटी रुपये दान सुद्धा मार्च महिन्यात दिले. पण, हे कोणत्या तारखेला दिले, याबाबात स्पष्टीकरण आरटीआयच्या उत्तरात दिले नाही. तर सार्वजनिक क्षेत्रातील सात बँकांकडून पाठवलेला निधीपैकी सर्वाधिक रक्कम एसबीआयची आहे.

याबाबत आरटीआयला उत्तर देताना सांगण्यात आले की, पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपये ३१ मार्चला देण्यात आले. देशातील सर्वात मोठ्या एसबीआय बँकेने असेही सांगितले की, ही सर्व रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून देण्यात आली आहे. तर आरबीआयने सांगितले की, ७.३४ कोटी रुपये कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून देण्यात आले.

आरटीआयमार्फत या बँका आणि संस्थांना विचारणा केली असता अशी माहिती समोर आलीः- कॅनरा बँकेने १५.५३ कोटींची रक्कम दिल्याचे सांगितले. पण याबाबत अधिक माहिती दिली नाही.- युनियन बँक ऑफ इंडियाने कर्मचार्‍यांच्या एक दिवसाच्या प्रिव्हिलेज रजेच्या एनकॅशमेंटमधून १४.८१ कोटी रुपयांचे योगदान दिल्याचे सांगितले.- सेंट्रल बँक ऑफ इंडियाने आपल्या कर्मचार्‍यांच्या दोन दिवसीय प्रिव्हिलेज रजेच्या एन्कॅशमेंटमधून ११.८९ कोटी रुपयांची मदत केली.- बँक ऑफ महाराष्ट्रने पाच कोटी रुपये दिले. एक दिवसाच्या पगारापासून आणि कर्मचार्‍यांच्या दोन दिवसांच्या रजेच्या एन्कॅशमेंटमधून ही रक्कम देण्यात आली. - एसआयडीबीआय, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाने पीएम केअर्स फंडसाठी ८० लाख रुपये दिले. कर्मचार्‍यांच्या पगारामधून ऐच्छिक योगदान म्हणून ही रक्कम जमा करण्यात आली.- जीआयसीने एक दिवसाच्या कर्मचार्‍यांच्या पगारामधून १४.५१ लाख रुपये दिले.- आयआरडीएआय, विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने १६.८ लाख रुपये दिले. ही रक्कम कर्मचाऱ्यांच्या ऐच्छिक योगदानामधून जमा करण्यात आली.- नाबार्ड, नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंटने ९.०४ कोटी रुपये पीएल केअर्स फंडसाठी दिले आहेत. कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांच्या पगारातून ही रक्कम देण्यात आली. - नॅशनल हाऊसिंग बँकेनेही कर्मचाऱ्यांच्या योगदानातून ३.८२ लाख रुपये दिले आहेत.

दरम्यान, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर २८ मार्चला पीएम केअर्स फंडची स्थापना करण्यात आली. या फंडमध्ये ३१ मार्चपर्यंत ३,०८६.६२ कोटी रुपये जमा झाले आहेत. जे पीएम कॅरेस फंडच्या अधिकृत वेबसाइटच्या माहितीनुसार संकेतस्थळानुसार 'ऐच्छिक योगदान' असल्याचे म्हटले आहे.

शैक्षणिक कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ‘पीएम केअर्स’साठी २२ कोटीनवोदय शाळांपासून ते आयआयटी, आयआयएम व केंद्रीय विद्यापीठांपर्यंतच्या शैक्षणिक संस्थांनी पीएम केअर्स निधीसाठी २१.८१ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. यापैकी बहुतांश रक्कम कर्मचाऱ्यांच्या वेतनातून देण्यात आली असल्याचे आरटीआयच्या माहितीतून समोर आले होते.

आणखी बातम्या...

- India-China standoff: भारताकडून लडाखमध्ये टी-९० आणि टी-७२ टँक तैनात; चीनला शिकवणार धडा

Amazon चा सर्वात मोठा Great Indian Festival सेल; 70 टक्क्यांपर्यंत सवलत अन् आकर्षक ऑफर्स

- CoronaVirus News : 'या' कारणामुळे लहान मुलं कोरोना संक्रमणापासून सुरक्षित; तज्ज्ञांचा दावा

-  सर्वात जुना घटक पक्ष एनडीएमधून बाहेर; भाजपा-अकाली दलाची २३ वर्षांची होती युती     

- "हिमालयात सर्व नियमांचे पालन केले, तरीही मला कोरोनाची लागण झाली"    

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकSBIएसबीआयLIC - Life Insurance Corporationएलआयसीbankबँक