१९०१ नंतर २०२४ ठरले भारतातील सर्वात उष्ण वर्ष, भारतीय हवामान विभागाची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 11:16 IST2025-01-02T11:15:55+5:302025-01-02T11:16:35+5:30

२०२४ मध्ये संपूर्ण भारतातील जमिनीच्या पृष्ठभागावरील हवेचे सरासरी तापमान सरासरीपेक्षा ०.६५ अंश सेल्सिअस जास्त होते, असे भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

2024 was the hottest year in India since 1901, according to the Indian Meteorological Department | १९०१ नंतर २०२४ ठरले भारतातील सर्वात उष्ण वर्ष, भारतीय हवामान विभागाची माहिती 

१९०१ नंतर २०२४ ठरले भारतातील सर्वात उष्ण वर्ष, भारतीय हवामान विभागाची माहिती 


नवी दिल्ली : १९०१ नंतर २०२४ हे भारतातील सर्वात उष्ण वर्ष होते. सरासरी किमान तापमान दीर्घकालीन सरासरीपेक्षा ०.९० अंश सेल्सिअस जास्त होते.

२०२४ मध्ये संपूर्ण भारतातील जमिनीच्या पृष्ठभागावरील हवेचे सरासरी तापमान सरासरीपेक्षा ०.६५ अंश सेल्सिअस जास्त होते, असे भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पूर्वी २०१६ ला जमिनीच्या पृष्ठभागावरील हवेचे सरासरी तापमान सामान्यपेक्षा ०.५४ अंश सेल्सिअस जास्त नोंदवले गेले होते.

जानेवारीमध्ये भारतातील बहुतेक भागात किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची अपेक्षा आहे. मध्य भारताच्या पश्चिम आणि उत्तरेकडील भागात जानेवारीमध्ये नेहमीपेक्षा जास्त थंड लाट येण्याची शक्यता आहे, असे आयएमडी बुधवारी सांगितले. 
 

Web Title: 2024 was the hottest year in India since 1901, according to the Indian Meteorological Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.