शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

योगींच्या भरवशावर २०२४ची सेमीफायनल; भाजप नेतृत्वाला एवढा विश्वास आहे की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2023 07:16 IST

उत्तर प्रदेशातील निवडणुकीचा पहिला टप्पा गुरुवारी पार पडला असला तरी उत्तर प्रदेशात भाजपचा कोणीही राष्ट्रीय नेता प्रचारासाठी तेथे गेलेला नाही

संजय शर्मानवी दिल्ली - २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीच्या उत्तर प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका भाजप पूर्णपणे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भरवशावर लढवत आहे. राज्यातील १७ महानगरपालिका जिंकण्यासाठी योगींना पूर्णपणे मोकळीक देण्यात आली आहे योगींवर भाजप नेतृत्वाला एवढा विश्वास आहे की, संपूर्ण पक्ष कर्नाटकमधील निवडणुकीत उतरला असताना लोकसभेच्या ८० जागा असलेल्या उत्तर प्रदेशला पूर्णपणे योगींच्या भरवशावर सोडण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशातील निवडणुकीचा पहिला टप्पा गुरुवारी पार पडला असला तरी उत्तर प्रदेशात भाजपचा कोणीही राष्ट्रीय नेता प्रचारासाठी तेथे गेलेला नाही. याबाबत जाणून घेण्यासाठी भाजपच्या एका नेत्याला विचारले असता, त्यांनी सांगितले की, योगींना उत्तर प्रदेशातच नव्हे तर कर्नाटकमध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर सर्वांत जास्त मागणी होत आहे. योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशबरोबरच कर्नाटकातही भाजपला जिंकून देण्याचे काम करीत आहेत.

उत्तर प्रदेशात १७ महापालिका, १९९ नगरपालिका, ५४४ नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. गुरुवारी पहिल्या टप्प्याचे मतदान झाले असून व ११ मे रोजी दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. १३ मे रोजी कर्नाटकबरोबरच येथील निकाल येणार आहेत. २०२४च्या निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशच्या निवडणुका सेमीफायनल समजल्या जात आहेत. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वांत जास्त ८० जागा आहेत व दिल्लीत सत्तेवर कोण येणार, हे याच जागा निश्चित करणार आहेत.

एवढ्या महत्त्वाच्या निवडणुका असतानाही यूपीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची सूत्रे योगींनी एकहाती सांभाळली आहेत. भाजपचा कोणीही नेता अद्याप यूपीमध्ये गेलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्यापर्यंत सर्व ज्येष्ठ नेते कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहेत. 

ना कर्फ्यू ना दंगा, सब कुछ चंगा ही चंगा 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही योगी आदित्यनाथ यांचा डंका वाजत आहे. कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर योगी आदित्यनाथ निवडणूक लढवत आहेत. अतीक अहमदसारक्या गँगस्टरचा खात्मा केल्यानंतर यूपीमध्ये ‘ना कर्फ्यू ना दंगा, सब कुछ चंगा ही चंगा’ हा नारा योगींनी दिला आहे. दुसऱ्या टप्प्याचे मतदान ११ मे रोजी होत आहे व दुसऱ्या टप्प्यात भाजपचे काही ज्येष्ठ नेते यूपीमध्ये निवडणूक प्रचारासाठी जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश