2019 मध्ये मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन करु - अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 20:03 IST2018-05-15T20:03:15+5:302018-05-15T20:03:15+5:30
विकासयात्रेमुळेच 15 व्या निवडणुकीत भाजपाला यश मिळाले आहे

2019 मध्ये मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन करु - अमित शाह
नवी दिल्ली - विकासयात्रेमुळेच 15 व्या निवडणुकीत भाजपाला यश मिळाले आहे. हा विकास पुढे आसाच चालेत राहिल. कर्नाटकमधील निकालावरुन जनतेचा मोदींवरील विश्वास पुन्हा सिद्ध झाला आहे. या विश्वासावरच 2019 मध्ये मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन करु असा विश्वास भाजापा अध्यक्ष अमित शाह यांनी व्यक्त केला.
भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीसाठी अमित शाह यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी पक्ष मुख्यालयात स्वागत केले आहे.