शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

2017 मध्ये 'या' घटनांनी भारताची जगभरात उंचावली मान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 4:21 PM

मुंबई - सर्वांनाच नव्या वर्षाची चाहूल लागली आहे. 2018 ची सकाळ उघडण्यासाठी काही तासं शिल्लक राहिले आहेत. अशामध्ये प्रत्येकजण ...

मुंबई - सर्वांनाच नव्या वर्षाची चाहूल लागली आहे. 2018 ची सकाळ उघडण्यासाठी काही तासं शिल्लक राहिले आहेत. अशामध्ये प्रत्येकजण आपण वर्षभर काय केलं आणि काय करायला नको होतं. याचं विश्लेषण करत असणार... अशात एकदा 2017ने आपल्याला काय-काय दिले? याचा विचार करायला हवा. या वर्षात अशा अनेक घटना घडल्या ज्यामुळे भारताची मान जगात उंचावली. मानुषी छिल्लर, बाहुबली, तिहेरी तलाकबद्दलचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, अशा अनेक घटनांकडे आपण पाहू शकतो. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात... 

  • मिस वर्ल्ड किताब : हरयाणाच्या मानुषी छिल्लर या तरुणीने मिस वर्ल्डचा किताब पटकावला. भारताकडे हा मान 17 वर्षांनी परत आला. 20 वर्षांची मानुषी मेडिकलची विद्यार्थिनी आहे. मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी ती सहावी भारतीय तरुणी आहे.

 

  • इस्रोची गगनभरारी : भारताची अंतराळ संशोधन संस्था Indian Space Research Organization (ISRO)ने यंदा एका दिवसात तब्बल 104 उपग्रह अंतराळात सोडत इतिहास घडवला. आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरीकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटर मधून 15 फेब्रुवारी 2017ला हे 104 उपग्रह घेऊन एक रॉकेट आकाशात झेपावले. यापैकी 3 उपग्रह भारताचे होते, तर उर्वरित 101 उपग्रह अमेरिका, नेदरलँड, स्वित्झर्लंड, इस्राईल, कझाकस्तान आणि UAE या देशांचे होते. 

 

  • ’बाहुबली, दंगलने'ने गाजवले : भारतासाठी 2017 हे वर्ष दोन ब्लॉकबस्टर चित्रपटांनी गाजवले. एक दंगल आणि दुसरा बाहुबली. दंगलने हा चित्रपट (2000 कोटी) जगभरात नावाजला गेला. त्या खालोखाल एस. राजमौली यांच्या 'बाहुबली'ने भारतातले बॉक्स ऑफिसचे सगळे विक्रम मोडीत काढले. या चित्रपटाने एकट्या भारतात 1400 कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

 

  • नौदलात महिलांचा समावेश : भारतीय नौदलात पायलट म्हणून नियुक्ती होणाऱ्या शुभांगी स्वरूप या पहिल्या महिला अधिकारी आहेत. मूळच्या उत्तर प्रदेशच्या असलेल्या शुभांगी 'मॅरिटाइम रेकनन्स एअरक्राफ्ट' चे सारथ्य करतील. याव्यतिरिक्त नौदलाची उपशाखा असणाऱ्या 'नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्टरेट' विभागात पहिल्यांदाच तीन महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.

 

  • क्रीडा जगतात अव्वल : या वर्षात भारताने कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारांमध्ये ICCच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. एकाच वेळी दोन्ही प्रकारांमध्ये अव्वल स्थान पटकावण्याची ही भारताची पहिली वेळ आहे. अंधांसाठी असलेला T20 वर्ल्डकप यंदा भारतीय टीमने जिंकला. भारताच्या किदांबी श्रीकांतने बॅडमिंटनमध्ये एका वर्षात चार सुपर सिरीज (इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क आणि फ्रान्स) जिंकण्याचा पराक्रम करत इतिहास घडवला. 

 

  • फिफा स्पर्धा भारतात : क्रिकेटवेड्या भारतात अंडर-17 फिफा वर्ल्डकप रंगला आणि देशभरात तब्बल 13.5 लाख लोकांनी या वर्ल्डकपचा आनंद लुटला. भारताला या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये काहीच जिंकता आले नसले तरी, केवळ यजमानपद मिळाल्याने भारतीय तरुणाईचा आनंद गगनात मावेनासा झाला.

 

  • तिहेरी तलाक : भारतातल्या मुस्लीम महिलांना दिलासा देणारा एक निर्णय ऑगस्ट 2017मध्ये सुप्रीम कोर्टाने दिला. सुप्रीम कोर्टाच्या पाच पैकी तीन न्यायमूर्तींनी मुस्लीम समाजात प्रचलित असलेली तिहेरी तलाकची पद्धत घटनाबाह्य असल्याचा निर्णय दिला. तिहेरी तलाकला गुन्हा ठरवणारे विधेयक केंद्रीय न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी 28 डिसेंबर 2017 रोजी संसदेत मांडले आणि लोकसभेने पास करत ते विधेयक आता राज्यसभेत मांडण्यात येणार आहे.

 

  • ट्रान्सजेंडरचे सक्षमीकरण : पश्चिम बंगालच्या ज्योइता मोंडल यांची भारतातल्या पहिल्या ट्रान्सजेंडर न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. तामिळनाडूच्या प्रीतिका अश्नी यांनी 'तामिळनाडू युनिफॉर्म सर्व्हिसेस रिक्रूटमेंट बोर्ड'च्या निर्णयाला कोर्टात आव्हान दिले होते. त्यानंतर त्या पहिल्या पोलीस उपनिरीक्षक बनल्या. तसेच भारतात पहिल्यांदाच कोचीच्या मेट्रोमध्ये 23 ट्रान्सजेंडरना एकाच वेळी नोकरी देण्यात आली.
टॅग्स :Best of 2017बेस्ट ऑफ 2017Flashback 2017फ्लॅशबॅक 2017