शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

२०१२ साली देखील दिल्लीत इस्राईली अधिकाऱ्यांच्या कारमध्ये झाला होता बॉम्बस्फोट

By पूनम अपराज | Updated: January 29, 2021 20:41 IST

Delhi Bomb Blast :दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, फायर ब्रिगेडची गाडी येईपर्यंत पोलिसांनी आधीच संपूर्ण परिसर व्यापला होता.

ठळक मुद्दे२०१२ साली फेब्रुवारी महिन्यात इस्त्रायली दूतावासाच्या अधिकाऱ्यांच्या कारला लक्ष्य करण्यात आले होत आणि बॉम्बस्फोट घडवून आणला होता. 

शुक्रवारी सायंकाळी देशाच्या राजधानी दिल्लीत आयईडी स्फोटाची घटना इस्त्रायली दूतावासाच्या बाहेर शुक्रवारी घडली. कमी तीव्रतेच्या स्फोटामुळे काही कारच्या काचा फुटल्या असल्याचे सांगितले जात आहे. कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी दिल्लीपोलिसांचे स्पेशल सेल तपास करत आहे. आज भारत आणि इस्रायल देखील त्यांच्या राजनैतिक संबंधांचा 29 वा वर्धापन दिन साजरा करीत आहेत. याबाबत इस्त्रायली दूतावासानेही ट्विट केले आहे. २०१२ साली फेब्रुवारी महिन्यात इस्त्रायली दूतावासाच्या अधिकाऱ्यांच्या कारला लक्ष्य करण्यात आले होत आणि बॉम्बस्फोट घडवून आणला होता. दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, फायर ब्रिगेडची गाडी येईपर्यंत पोलिसांनी आधीच संपूर्ण परिसर व्यापला होता. फायर कारनेही जाऊ दिले नाही. औरंगजेब रोडवर बॉम्बचा स्फोट झाला होता, असे अग्निशमन नियंत्रण कक्षाला 6 वाजता फोन आला. हा फोन येताच घटनास्थळावर कॅनॉट प्लेस येथील अग्निशमन केंद्रातून तीन वाहने पाठविली गेली.

खळबळ उडवण्यासाठी स्फोट

इस्त्रायली दूतावासापासून सुमारे 150 मीटर अंतरावर हा स्फोट झाला. अग्निशमन विभागाची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. घटनास्थळी दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित आहेत. डॉ. एपीजे अब्दुल कलाम रोडवर इस्राईलचे दूतावास  आहे. संपूर्ण परिसर सीलबंद करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांव्यतिरिक्त पीआरओ अनिल मित्तल म्हणाले की, प्राथमिक तपासणीतून असे दिसते की, एखाद्याने खळबळ उडवण्यासाठी हे केले असेल.काही किमी अंतरावर सुरु होता बीटिंग रिट्रीट सोहळा

दिल्लीतील औरंगजेब मार्गावरील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटामुळे दिल्ली पोलिसांत खळबळ उडाली आहे. या परिसरापासून काही किलोमीटर अंतरावर बीटिंग रिट्रीट सोहळा चालू असताना स्फोट झाला होता, जिथे अनेक व्हीआयपी उपस्थित असतात.

दिल्लीतील इस्रायलच्या दुतावासाजवळ स्फोट; पोलिसांचं विशेष पथक घटनास्थळी

 

टॅग्स :Blastस्फोटIsraelइस्रायलdelhiदिल्लीPoliceपोलिसBombsस्फोटके