२०... वाडी... मेघे

By Admin | Updated: March 20, 2015 22:40 IST2015-03-20T22:40:13+5:302015-03-20T22:40:13+5:30

(फोटो)

20 ... wadi ... meghe | २०... वाडी... मेघे

२०... वाडी... मेघे

(फ
ोटो)
वाडीवासीयांची पाणीसमस्या सुटणार
समीर मेघे : पाणीपुरवठा योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी
वाडी : स्थानिक पाणीपुरवठा योजनेचे काम तीन टप्प्यात पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला शासनाने प्रशासकीय मंजुरी दिली असून, त्यासाठी १३ कोटी ६ लाख ५६ हजार रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. ही योजना कार्यान्वित होताच वाडीवासीयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, अशी माहिती आ. समीर मेघे यांनी पत्रपरिषदेत दिली.
समीर मेघे यांनी सांगितले की, या पाणीपुरवठा योजनेला २००९ मध्ये तत्कालीन शासनाने मंजुरी दिली होती. त्यावेळी या योजनेसाठी ११ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्रस्तावित केला होता. ही योजना तीन टप्प्यात पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात दोन कोटी रुपये, दुसऱ्या टप्प्यात तीन कोटी २५ लाख रुपये देण्यात आले. या निधीतून जलकुंभाचे बांधकाम करून ७६ कि.मी. नवीन पाईप लाईन टाकण्यात आली. तिसऱ्या टप्प्यातील निधी मिळण्यास विलंब झाल्याने ही योजना रखडल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ही योजना मार्गी लावण्यासाठी तत्कालीन आमदार विजय घोडमारे यांनी पाठपुरावा केला. योजना रखडल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक गंभीर होत गेली. याच काळात वाडी ग्रामपंचायतला नगर परिषदेचा दर्जा प्रदान करण्यात आला. त्यामुळे निधी उपलब्ध करून देण्यात काही अडचणी येत होत्या. ही योजना मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी १३ जानेवारी रोजी चर्चा केली. विशेष बाब म्हणून या योजनेला निधी मंजूर करण्याचे त्यांनी त्यावेळी आश्वासन दिले होते, असेही मेघे यांनी सांगितले.
त्या अनुषंगाने शासनाने या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील कामांना प्रशासकीय मंजुरी प्रदान केली असून, त्यासाठी १३ कोटी सहा लाख ५६ हजार रुपयांच्या निधीची तरतूद केली. सध्या नगर परिषद निवडणूक आचारसंहिता असल्याने या कामांना सुरुवात करता येणे शक्य नाही. निवडणूक आटोपताच त्या कामांना सुरुवात केली जाईल, अशी माहितीही आ. मेघे यांनी यावेळी दिली. पत्रपरिषदेला प्रेम झाडे, नरेश चरडे, सतीश जिंदल, आनंद कदम, राजेश जिरापुरे, अभय कुनावार, दिनेश कोचे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
***

Web Title: 20 ... wadi ... meghe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.