२० हजार रुपयांनी केली फसवणूक
By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:24+5:302015-01-31T00:34:24+5:30
२० हजार रुपयांनी केली फसवणूक

२० हजार रुपयांनी केली फसवणूक
२ हजार रुपयांनी केली फसवणूकनागपूर : २० हजार रुपयांनी फसवणूक करणाऱ्या आरोपींविरुद्ध तहसिल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सागर महादेव सानगडीवर (२१) रा. बिनाकी मंगळवारी हे सेंट्रल ॲव्हेन्यू रोडवरील रस्ता दुभाजकाच्या पलिकडे असलेल्या पंजाब नॅशनल बँकेत उभे होते. तेवढ्यात दोन अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. आम्ही आमच्या मालकाजवळून १.२५ लाख रुपये आणले असून एवढी रक्कम आम्ही आमच्या खात्यात टाकू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर सागरने मी पैसे भरून देतो, असे सांगितले. दोन्ही आरोपींनी त्यास बाहेर आणले. आपल्या जवळील निळ्या रुमालात असलेली गड्डी पैशांची असल्याचे त्यांनी भासवून या गड्डीतील अर्धे पैसे देण्याचे आमिष सागरला दाखविले. त्यांनी सागरजवळील २० हजार रुपये घेऊन तेथून निघून गेेले. थोड्या वेळाने सागरने या इसमांनी दिलेल्या रुमालातील गड्डी पाहिली असता ती कागदाची असल्याचे त्याच्या लक्षात आले. फसवणूक झाल्याचे समजताच त्याने तहसिल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.