२० सभासदांना प्रत्येकी ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी बचत गटाचा उपक्रम : दंड व व्याजाच्या रकमेतून लाभ
By Admin | Updated: December 14, 2014 00:07 IST2014-12-12T16:56:30+5:302014-12-14T00:07:00+5:30
औसा : बचत गट हे आज बचतीचे प्रभावी माध्यम ठरत आहे़ बचत गटातील बचत ही अडचणीवेळी उपयोगी ठरते़ त्यामुळे बचत गटाची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ तालुक्यातील हिप्परसोगा येथील एका गटाने दंड व व्याजाच्या रकमेतून गटातील २० सदस्यांना प्रत्येकी ५ ग्रॅम सोन्याची अंगठी दिली आहे़

२० सभासदांना प्रत्येकी ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी बचत गटाचा उपक्रम : दंड व व्याजाच्या रकमेतून लाभ
औसा : बचत गट हे आज बचतीचे प्रभावी माध्यम ठरत आहे़ बचत गटातील बचत ही अडचणीवेळी उपयोगी ठरते़ त्यामुळे बचत गटाची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे़ तालुक्यातील हिप्परसोगा येथील एका गटाने दंड व व्याजाच्या रकमेतून गटातील २० सदस्यांना प्रत्येकी ५ ग्रॅम सोन्याची अंगठी दिली आहे़
तालुक्यातील हिप्परसोगा येथे दहा वर्षांपूर्वी शिवशंकर युवा बचत गट तयार करण्यात आला़ या गटाची आजची बचत ही ७ लाखांवर पोहोचली आहे़ या बचत गटाचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते आहे़ दर महिन्याला प्रत्येक सदस्य १०० रूपये जमा करायचे़ या जमा रकमेतून बचत गटातील सदस्यांनाच कर्ज द्यायचे ठरले़ प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला कर्जाचा हप्ता व व्याज द्यायचे ठरले़ ठराविक तारखेस पैसे जमा न केल्यास दोनशे रूपये दंड असा नियम लागू करण्यात आला़ त्यानंतर बँकेने २ लाख रूपये कर्ज बचत गटास मंजूर केले़ ते अवघ्या दहा महिन्यात परतफेड केली़
या बचत गटात दंड आणि व्याज मिळून जी रक्कम जमा झाली़ त्या रकमेतून प्रत्येक सभासदास पाच ग्रॅम सोने देणयाचे ठरले आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक एस़एऩबे्रदे्र यांच्या हस्ते गुरुवारी या सोन्याचे वाटप करण्यात आले़ यावेळी बचत गटाचे अध्यक्ष हेमंत पाटील, राजकुमार सोमवंशी, जनार्धन चेवले, महादेव चिंचोले, वैैभव जोशी, विठ्ठल सोमवंशी, बालाजी आळंदकर, बाबाराव सोमवंशी, संभाजी यादव, बाबू मस्के, नामदेव मंदाडे आदी उपस्थित होते़