दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मणीपूरमध्ये २० जवान शहीद

By Admin | Updated: June 4, 2015 15:14 IST2015-06-04T15:14:06+5:302015-06-04T15:14:06+5:30

मणीपूरमधल्या चंडेल जिल्ह्यामध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला असून त्यामध्ये तब्बल २० जवान शहीद झाले आहेत तर आठ ते १० जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे.

20 jawans martyred in Manipur in terror attack | दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मणीपूरमध्ये २० जवान शहीद

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मणीपूरमध्ये २० जवान शहीद

चंडेल (मणीपूर), दि. ४ - मणीपूरमधल्या चंडेल जिल्ह्यामध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला असून त्यामध्ये तब्बल २० जवान शहीद झाले आहेत तर आठ ते १० जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. 

आज सकाळी नऊच्या सुमारास ६, डोग्रा रेजिमेंटचे जवान एका ठिकाणाहून दुसरीकडे जाण्याची तयारी करत होते. त्याचवेळी त्यांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी जोरदार हल्ला चढवला. दहशतवाद्यांकडे रॉकेट लाँचर्स, बाँब व मशिनगन्ससारखी अद्ययावत शस्त्रास्त्रे होती असे लष्करी अधिका-यांनी सांगितले. हा हल्ला स्थानिक दहशतवाद्यांनी केल्याचा संशय आहे. अर्थात, या भागामध्ये जवळपास आठ ते १० दहशतवादी संघटना असल्यामुळे हा हल्ला नक्की कोणत्या गटाने केला याबाबत खात्रीशीर माहिती अद्याप मिळालेली नाही.

जखमी जवानांना नागालँडमध्ये हवाईमार्गे उपाचारांसाठी हलवण्यात आले आहे.

Web Title: 20 jawans martyred in Manipur in terror attack