शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभा निवडणुकीपूर्वी घोडेबाजार! काँग्रेस आमदारांना 'ब्लँक चेक'ची ऑफर; २ संशयित ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 19:20 IST

ओडिशातील काँग्रेस आमदारांना फोडण्यासाठी पैशांची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर

Odisha Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर देशाच्या राजकारणात घोडेबाजाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ओडिशातील काँग्रेस आमदारांना फोडण्यासाठी बंगळुरू येथील एका रिसॉर्टमध्ये शिरून त्यांना कोट्यवधी रुपयांची लाच आणि चक्क ब्लँक चेक ऑफर केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

१६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी ओडिशामधील ९ पैकी ८ काँग्रेस आमदारांना बंगळुरूजवळील बिदादी येथील वंडरला रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, रविवारी ओडिशातीलच चार अज्ञात व्यक्तींनी या रिसॉर्टमध्ये प्रवेश मिळवला. या व्यक्तींनी काँग्रेस आमदारांना भेटून एका विशिष्ट उमेदवाराला मतदान करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

'ब्लँक चेक' आणि जीवे मारण्याची धमकी

ओडिशा काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे उपनेते अशोक कुमार दास यांनी बिदादी पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार चार व्यक्तींनी आमदारांना प्रत्येकी कोट्यवधी रुपये आणि कोरा चेक देऊन मत खरेदी करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा काँग्रेस आमदारांनी ही ऑफर धुडकावून लावली, तेव्हा संबंधित व्यक्तींनी त्यांना शिवीगाळ केली. तसेच, ओडिशात परतलात तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

बंगळुरू दक्षिणचे पोलीस अधीक्षक आर. श्रीनिवास गौडा यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, "आमदारांच्या तक्रारीवरून प्राथमिक चौकशी सुरू आहे. वीरेंद्र प्रसाद, सुरेश, अजित कुमार साहू आणि सिमाचल महाकुड या चौघांची नावे तक्रारीत आहेत. त्यापैकी दोन जणांना आम्ही ताब्यात घेतले आहे."

निवडणुकीचे समीकरण 

ओडिशामध्ये सत्ताधारी भाजप सरकारने राज्यसभेसाठी अतिरिक्त उमेदवार उभा केल्यामुळे काँग्रेसच्या गोटात धाकधूक होती. यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून १२ मार्च रोजी या आमदारांना कर्नाटकात हलवण्यात आले होते. हे आमदार आता मतदानाच्या काही तास आधीच भुवनेश्वरला परतणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Horse-trading Allegations Before Rajya Sabha Polls; Blank Check Offer, Two Arrested

Web Summary : Ahead of Rajya Sabha elections, Congress MLAs in Odisha were offered blank checks to switch allegiances. Two individuals are arrested after allegedly offering bribes and threats at a Bengaluru resort, sparking political turmoil.
टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाcongressकाँग्रेसBJPभाजपाOdishaओदिशा