गुवाहाटीतील फॅन्सी बाजारमध्ये २ स्फोट, ३-४ जण जखमी

By Admin | Updated: December 5, 2015 18:11 IST2015-12-05T18:11:04+5:302015-12-05T18:11:20+5:30

आसामच्या गुवाहाटी येथे फॅन्सी बाजार परिसरात शनिवारी दुपारी झालेल्या दोन स्फोटांत तीन ते चार जण जखमी झाले.

2 blast in Guwahati fancy market, 3-4 others injured | गुवाहाटीतील फॅन्सी बाजारमध्ये २ स्फोट, ३-४ जण जखमी

गुवाहाटीतील फॅन्सी बाजारमध्ये २ स्फोट, ३-४ जण जखमी

ऑनलाइन लोकमत

गुवाहाटी, दि. ५ - आसामच्या गुवाहाटी येथे फॅन्सी बाजार परिसरात शनिवारी दुपारी झालेल्या दोन स्फोटांत तीन ते चार जण जखमी झाले आहेत. दुपारच्या सुमारास लागोपाठ हे दोन स्फोट झाल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. 
फॅन्सी बाजार हे गुवाहाटीमधील व्यापाराचे केंद्र म्हणून ओळखले जात असल्यामुळे हा भाग नेहमीच गर्दीने गजबजलेला असतो. या परिसरात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका बॅगमध्ये स्फोटक पदार्थ ठेवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  पोलीस या स्फोटांची चौकशी करत असून उल्फा या संघटनेवर प्राथमिक संशय व्यक्त होत आहे. 

Web Title: 2 blast in Guwahati fancy market, 3-4 others injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.