शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

PM Modi: वर्षभरात १०० देशांना कोरोना लस पुरवली, फार्मा क्षेत्रात जगात भारताचाच डंका- पंतप्रधान मोदी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 6:39 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी फार्मा क्षेत्रातील पहिल्यावहिल्या जागतिक शिखर संमेलनाचं उदघाटन केलं. यात पंतप्रधान मोदींनी भारतानं गेल्या वर्षभरात फार्मा क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा दाखला देत जगासमोर आपण आदर्श निर्माण केला असल्याचं म्हटलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी फार्मा क्षेत्रातील पहिल्यावहिल्या जागतिक शिखर संमेलनाचं उदघाटन केलं. यात पंतप्रधान मोदींनी भारतानं गेल्या वर्षभरात फार्मा क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा दाखला देत जगासमोर आपण आदर्श निर्माण केला असल्याचं म्हटलं. "गेल्या वर्षभरात आपण जवळपास १०० देशांना कोरोना लसीचे ६.५ कोटीहून अधिक डोस निर्यात केले आहेत. तसंच येत्या काळात जसजशी आपली उत्पादन क्षमता वाढेल त्यासंदर्भात आपण आणखी मोठं लक्ष्य गाठू शकणार आहोत. भारतीय आरोग्य क्षेत्रावरील जगानं दाखवलेल्या विश्वासामुळे आज फार्मा क्षेत्रात भारताचाच डंका आहे", असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 

"भारतानं २०१४ नंतर आरोग्य सेवा क्षेत्रानं परदेशी गुंतवणूकीतील १२ बिलियन अमेरिकी डॉलरचं लक्ष्य गाठलं आहे. भारताला चिकित्सा उपकरणं आणि औषधांच्या संशोधनामध्ये अव्वल स्थान गाठून देण्यासाठीच्या दृष्टीकोनातून काम करायचं आहे", असंही मोदी म्हणाले. 

जागतिक कंपन्यांना दिलं भारतात येण्याचं आमंत्रणउद्योगाच्या मागणीनुसार नियमकांच्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या साच्यात बदल करण्यासाठीच्या मुद्द्यावर आम्ही नक्कीच संवेदनशील आहोत. त्यादृष्टीनं सकारात्मकरित्या काम केलं जात आहे. आरोग्य क्षेत्रात आणखी मजबूती येण्यासाठी औषधं आणि लसींसाठीचा कच्चामाल देशातच निर्माण करण्याचं कार्य वेगानं केलं पाहिजे. सर्व जागतिक कंपन्यांना माझं आवाहन आहे की भारतात येऊन काम करावं तसंच इथं येऊन संशोधन करावं त्यासाठी सर्व सहकार भारत सरकार करेल", असं मोदी म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीHealthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लस