शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

1977 मध्ये विरोधकांच्या आघाडीचा जनता पक्ष सत्तेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 06:03 IST

लोकसभेच्या १९७१ च्या निवडणुकीत प्रचंड यश मिळविलेल्या, पाकची फाळणी करून बांग्लादेशाची निर्मिती करणाऱ्या इंदिरा गांधी राजकीय विजनवासात गेल्या. त्यांच्यामागे चौकशा लावल्या. मात्र, जनता पक्षाला पाच वर्षे सरकार चालविता आलेच नाही.

- वसंत भोसलेइंदिरा गांधी यांनी पक्षांतर्गत विरोधक, विरोधी पक्षनेते, शेजारील राष्ट्रांचे विरोधक जागतिक पातळीवरील राजकीय विरोधक आदी सर्वांवर मात करीत स्वत:चे कणखर नेतृत्व सिद्ध केले होते. मात्र, देशांतर्गत आर्थिक परिस्थिती खालावत असताना व लाडके चिरंजीव संजय गांधी यांच्या एकारलेल्या भूमिकेमुळे भारतीय लोकशाहीवर डाग उमटले. याच क्रमाने आणीबाणी लागू करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. हा निर्णय कोणालाच आवडला नव्हता. काँग्रेसमधील अनेक नेत्यांनाही तो अमान्य होता. बरेच नेते त्यामुळे पक्षातून बाहेर पडले. विरोधकांनी वैचारिक मतभेद बाजूला सारत एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. उजव्या कम्युनिस्टांनी मात्र इंदिरा गांधी यांना आंतरराष्ट्रीय साम्राज्यवादाशी लढणाऱ्या नेत्या म्हणून पाठिंबा दिला होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष विरोधात होता, पण इतर विरोधी पक्षांमध्ये सामील झाला नव्हता.समाजवादी, संघटना काँग्रेस, जनसंघ, प्रजासमाजवादी, स्वतंत्र पक्ष, आदींच्या आणीबाणीच्या विरोधातील संयुक्त चळवळीचा दबाव वाढत गेला. देशातील सर्व तुरुंग राजकीय कार्यकर्त्यांनी भरले गेले. अशा वातावरणात लोकसभेच्या सहाव्या निवडणुका जाहीर करणे क्रमप्राप्त होते. पहिल्यांदाच लोकसभेची पाचऐवजी सहा वर्षांची टर्म केली गेली होती. जानेवारी, १९७७ मध्ये निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजवादी पक्ष, जनसंघ, संघटना काँग्रेस आणि स्वतंत्र पक्षाने आपले झेंडे गुंडाळून ठेवून चौधरी चरणसिंग यांच्या भारतीय लोकदलाच्या चिन्हावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला.मतदार पुनर्रचनेनुसार लोकसभेच्या आता ५४२ जागा झाल्या होत्या. लोकदलाने त्यापैकी ४०५ जागा लढविल्या आणि काही जागा प्रादेशिक पक्षांना सोडून दिल्या. लोकदलाने २९५ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले. एकूण ३२ कोटी ११ लाख ७४ हजार ३२७ मतदारांपैकी ६०.४९ टक्के जणांनी मतदान केले. त्यापैकी ४१.३२ टक्के मते भारतीय लोकदलाने घेतले. काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि लढविलेल्या ४९२ पैकी १५४ जागा काँग्रेसने जिंकल्या. या सहाव्या लोकसभेत प्रथमच सत्तांतर झाले, विरोधक प्रथमच सत्तेवर आले, काँग्रेस प्रथमच विरोधी बाकावर बसली आणि किमान दहा टक्के जागा जिंकण्याच्या अटीनुसार प्रथमच देशाला अधिकृत विरोधी पक्षही मिळाला.काँग्रेसचा सर्वाधिक मोठा पराभव उत्तर आणि पश्चिम भारतात झाला. पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा रायबरेलीतून, तर संजय गांधी यांचा अमेठीतून पराभव झाला. उत्तर प्रदेशात सर्वच्या सर्व ८५ जागा भारतीय लोकदलाने जिंकल्या. बिहारमध्ये ५४ पैकी ५२, मध्य प्रदेशात ४० पैकी ३७, राजस्थानात २५ पैकी २४, दिल्लीत सर्वच्या सर्व सात, हरयाणात सर्व दहाच्या दहा, गुजरातमध्ये २६ पैकी बावीस जागा भारतीय लोकदलाने जिंकल्या. काँग्रेसला आंध्र प्रदेश व कर्नाटकाने साथ दिली. महाराष्ट्रात संमिश्र यश मिळाले. आंध्रात ४२ पैकी ४१, तर कर्नाटकात २८ पैकी २६ जागा काँग्रेसने जिंकून आणीबाणीचा परिणाम जाणवू दिला नाही. प्रादेशिक पक्षांनी ४९ जागा जिंकल्या. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला फटका बसला. त्यांना केवळ सातच जागा मिळाल्या. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने २२ जागा जिंकल्या.काँग्रेसचा पराभव झाला असला, तरी त्यांना मिळालेली मते मात्र ३४.५२ टक्के होती. विशेषत: दक्षिण आणि पूर्व भारतातून काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. सहाव्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल २१ मार्च, १९७७ रोजी जाहीर होऊ लागला आणि लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचा दिलेला नारा २२ मार्चच्या पहाटेपर्यंत उगवू लागला. पूर्वाश्रमीचे काँग्रेसी नेते मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली २४ मार्च रोजी विरोधी पक्षांच्या आघाडीचे सरकार सत्तेवर आले. समाजवादी, जनसंघ, संघटना काँग्रेस आणि स्वतंत्र पक्षाच्या उमेदवारांनी भारतीय लोकदलाच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती. या पक्षाचे विसर्जन करून जनता पक्षाची स्थापना सरकार आल्यावर करण्यात आली. या सरकारला जनता पार्टीचे सरकार म्हटले गेले असले, तरी या पक्षाची स्थापना सरकार सत्तेवर आल्यावर झाली. महाराष्ट्रात ४८ पैकी २० जागा काँग्रेसने जिंकल्या. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात काँग्रेसला साथ मिळाली. मुंबईसह कोकण पट्ट्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला. मुंबईतील सर्व मतदारसंघांत काँग्रेस पराभूत झाली. मराठवाडा व खान्देशात संमिश्र निकाल लागले. साताºयातून माजी केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण नेहमीप्रमाणे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. सहाव्या लोकसभेत त्यांचीच विरोधी पक्षनेता म्हणून निवड झाली.उद्याच्या अंकात जनता पक्षाला यश टिकविता आले नाही

टॅग्स :PoliticsराजकारणIndiaभारत