शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

...जेव्हा महात्मा गांधींनी केरळमधील पूरग्रस्तांना केली होती 6 हजारांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2018 8:10 AM

महात्मा गांधींनी केरळमधील पूरग्रस्तांसाठी मदतनिधी गोळा केला होता

तिरुवनंतपुरम: देवभूमी अशा ओळख असणारं सध्या केरळ भीषण पूर परिस्थितीचा सामना करत आहे. राज्यातील सर्व नद्यांना पूर आल्यानं होत्याचं नव्हतं झालं आहे. संपूर्ण भारतातून केरळला मदत केली जात आहे. याआधी शतकभरापूर्वीही केरळमध्ये महापूर आला होता. तेव्हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी केरळसाठी मदतनिधी उभारला होता. त्यांनी पूरग्रस्तांसाठी 6 हजार रुपयांची मदत केली होती. केरळमधील पुरानं आतापर्यंत 290 लोकांचा मृत्यू झाला आहे. तब्बल 10 लाखांहून अधिक लोकांना या पुराचा फटका बसला आहे. 1924 मध्ये आलेल्या पुरानं अशाच प्रकारे केरळमध्ये हाहाकार माजवला होता. त्यावेळीही हजारो लोक पुरामुळे बेघर झाले होते. तर अनेकांचा मृत्यू झाला होता. केरळमधील मलबार प्रांताला या पुराचा सर्वाधिक फटका बसला होता. त्यावेळी महात्मा गांधींनी त्यांच्या 'यंग इंडिया' आणि 'नवजीवन' या प्रकाशनांमधून केरळमधील पूर परिस्थितीची माहिती देणारे लेख प्रसिद्ध केले होते. यामधून त्यांनी केरळमधील पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. महात्मा गांधी यांच्या आवाहनानंतर देशभरातून पूरग्रस्तांसाठी मदतीचे असंख्य हात पुढे आले. आबालवृद्धांनी पूरग्रस्तांना सढळ हस्ते मदत केली. विशेष म्हणजे अनेक महिलांनी त्यांचे दागिने विकून मदतनिधी गोळा केला. याशिवाय खाऊसाठी साठवलेले पैसे पूरग्रस्तांसाठी देणाऱ्या लहानग्यांची संख्यादेखील लक्षणीय होती. महात्मा गांधींनी त्यांच्या लेखांमध्ये याबद्दलचा उल्लेख केला आहे. केरळमधील पूरग्रस्तांना मदत करता यावी, यासाठी अनेकांनी एकवेळचं जेवण घेणं बंद केलं होतं. देशवासीयांनी केरळमधील पूरग्रस्तांना केलेली मदत अविश्वसनीय होती. देशातील नागरिकांनी आपल्या आवाहनाला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिला, असं महात्मा गांधी त्यांच्या लेखात म्हटलं होतं.  

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीKerala Floodsकेरळ पूर