शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

चहा, सिगरेटसाठी ब्रेक घेत तरुणीवर तीन तास केला बलात्कार, आई-वडिल पोलिसात असतानाही तक्रार घेण्यास टाळाटाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 12:38 IST

19 वर्षीय तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जवळपास तीन तास तरुणीवर बलात्कार होत होता. बलात्कार करणा-या आरोपींनी चहा आणि सिगरेटसाठी ब्रेकही घेतला होता. यानंतर पुन्हा त्यांनी आपला अत्याचार सुरु ठेवला.

ठळक मुद्दे19 वर्षीय तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बलात्कार करणा-या आरोपींनी चहा आणि सिगरेटसाठी ब्रेक घेतला, आणि पुन्हा बलात्कार करण्यास सुरुवात केलीरेल्वे पोलिसांनी ही एक फिल्मी स्टोरी असल्याचा शेरा करत तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिलापीडित तरुणीचे वडिल पोलीस उपनिरीक्षक आणि आई सीआयडीत असतानाही पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळतक्रार दाखल न करणा-या पोलिसाला निलंबित करण्यात आलं आहे

भोपाळ - 19 वर्षीय तरुणीवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जवळपास तीन तास तरुणीवर बलात्कार होत होता. बलात्कार करणा-या आरोपींनी चहा आणि सिगरेटसाठी ब्रेकही घेतला होता. यानंतर पुन्हा त्यांनी आपला अत्याचार सुरु ठेवला. शहरातील गजबजलेल्या ठिकाणी ब्रिजखाली तरुणीवर बलात्कार होत असताना आजूबाजूने जाणा-या लोकांना आणि वाहनांना साधं हे दिसलंही नसावं याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. महत्वाची आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे पीडित तरुणीचे वडिल पोलीस उपनिरीक्षक आणि आई सीआयडीत असतानाही पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली. रेल्वे पोलिसांनी ही एक फिल्मी स्टोरी असल्याचा शेरा करत तक्रार दाखल करुन घेण्यास नकार दिला होता. जेव्हा पीडित तरुणीने स्वत: दोन आरोपींना पकडून पोलिसांसमोर हजर केलं, तेव्हा कुठे पोलिसांनी घटनेची दखल घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी तक्रार दाखल न करणा-या पोलिसाला निलंबित करण्यात आलं आहे. 

स्त्रियांसाठी सुरक्षित समजल्या जाणा-या भोपाळ शहरात झालेल्या सामूहिक बलात्कारामुळे शहर हादरलं आहे. ज्या ठिकाणी बलात्कार झाला तिथला रस्ता नेहमी गजबजलेला असतो. तेथून 100 मीटर अंतरावर हबीबगंज रेल्वे स्थानक आहे. धक्कादायक म्हणजे आरपीएफ पोस्ट तर फक्त 50 मीटर अंतरावर होती. बलात्कार झाला तेथून 100 मीटर अंतरावर रस्त्यावरुन गाड्या धावत होत्या. मात्र एकालाही तरुणीवर बलात्कार होत असल्याची दखल घेणं महत्वाचं वाटलं नाही.

पीडित तरुणी युपीएससी परिक्षेसाठी तयारी करत होती. यासाठी रोज ती प्रवास करत असे. मंगळवारी संध्याकाळी कोचिंग क्लास संपल्यानंतर हबीबगंज स्थानकाच्या दिशेने ती चालत निघाली होती. अंतर फार नसल्याने ती चालत चालली होती. जवळपास सात वाजण्याच्या सुमारास गोलू बिहारी याने तिचा हात पकडला. तरुणीने लात घालून त्याला खाली पाडलं. यामुळे चिडलेल्या गोलूने आपला मित्र अमर घुंटू याला हाक मारली. दोघांनी तिला फरफटत जवळच्या नाल्याजवळ नेल. यावेळी तरुणी दोघांनाही दगडाने मारण्याचा प्रयत्न करत होती. 

यानंतर दोघा आरोपींनी तरुणीला बांधलं, आणि बलात्कार केला. 15 मिनिटं झाल्यानंतर गोलू बिहारी गुटखा आणि सिगरेट आणण्यासाठी निघून गेला. त्याने अमरला लक्ष ठेवण्यासाठी तिथेच उभं केलं होतं. अमर आणि गोलू एकमेकांचे साडू आहेत. 

पीडित तरुणीने आपले कपडे फाटले असल्याने अंगावर घालण्यासाठी कपडे देण्याची विनंती केली. यावेळी गोलूने काही कपडे आणून दिले. कदाचित त्याने आपल्या बायकोचे कपडे आणले होते. यावेळी अजून दोघांना तो आपल्यासोबत घेऊन आला होता. यानंतर पुन्हा तरुणीवर बलात्कार करण्यात आला. गोलूसोबत आलेल्या राजेश आणि रमेश यांनीही त्यांना साथ दिली. रात्री 10 वाजेपर्यंत हा प्रकार सुरु होता. यानंतर अखेर आरोपींनी पीडित तरुणीला जाण्याची परवानगी दिली. पण त्याआधी मोबाइल फोन, घड्याळ आणि अंगावरील दागिने ठेवून जायला सांगितलं. 

पीडित तरुणीने यानंतर तात्काळ जवळ असणा-या आरपीएफ पोस्टकडे धाव घेतली आणि आपल्या आई-वडिलांना फोन केला. आपल्या मुलीचा शोध घेत फिरत असलेल्या वडिलांनी तिला घरी नेलं. सकाळी तक्रार करण्यासाठी पीडित तरुणी आई-वडिलांसहित एम पी नगर पोलीस ठाण्यात पोहोचले. पण पोलिसांनी त्यांना हबीबगंज पोलीस ठाण्यात जायला सांगितिलं. हबीबगंज पोलिसांनीही तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ करत त्यांना जीआरपीकडे जाण्यास सांगितलं. तिथे पोहोचून घटनेबद्दल सांगितलं असता, अधिका-याने फिल्मी स्टोरी सांगत असल्याचा शेरा केला.

'हबीबगंज येथून येत असताना माझ्या मुलीने दोघा आरोपींना पाहिलं. घटनास्थळापासून 500 मीटर अंतरावर ते होते', अशी माहिती पीडित तरुणीच्या आईने दिली. यानंतर पोलीस, पीडित तरुणी आणि तिच्या आई-वडिलांनी पाठलाग करुन त्यांना पकडलं. दोघा आरोपींना हबीबगंज जीआरपीच्या ताब्यात देण्यात आलं आहे. 

'हा माझ्या आयुष्यातील एक वाईट अनुभव होता. जर एका पोलीस कर्मचा-यासोबतच पोलीस असं वागत असतील, तर सामान्य माणसाला काय अनुभव येत असेल याची कल्पना करु शकते', असं पीडित तरुणीची आई बोलली आहे.  

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसCrimeगुन्हा